अहमदनगरसाबणाने 20 सेकंद हात धुतले तर हे 3 आजार कधीच नाहीत होणार,...

साबणाने 20 सेकंद हात धुतले तर हे 3 आजार कधीच नाहीत होणार, जाणून घ्या!

कोणी शिंकलं तरी त्याच्याकडून दुसऱ्या व्यक्तीला लगेच आजार होण्याची शक्यता असते. त्यात सध्याच्या धावपळीच्या जगात लोक स्वतःकडे लक्ष देण्याचे देखील विसरतात. मग साधं ते हात धुवायचं देखील विसरून जातात. कुठेही अस्वच्छ ठिकाणी स्पर्श करणे किंवा शिंकणे अशा वेळी लोक हात धुवायचं विसरून जातात

spot_img

मुंबई : सध्याच्या काळात प्रदूषण, घाण, साथीचे रोग पसरताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यात बदलत्या वातावरणामुळे विषाणूजन्य रोग मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहेत.

कोणी शिंकलं तरी त्याच्याकडून दुसऱ्या व्यक्तीला लगेच आजार होण्याची शक्यता असते. त्यात सध्याच्या धावपळीच्या जगात लोक स्वतःकडे लक्ष देण्याचे देखील विसरतात. मग साधं ते हात धुवायचं देखील विसरून जातात. कुठेही अस्वच्छ ठिकाणी स्पर्श करणे किंवा शिंकणे अशा वेळी लोक हात धुवायचं विसरून जातात, त्यामुळे त्यांना अनेक गंभीर समस्यांचा, आजारांचा सामना करावा लागतो.

आजकाल श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. लोकांना धुळीची ॲलर्जी असते किंवा वाढते प्रदूषण यामुळे लोकांना श्वसनाचे आजार निर्माण होताना दिसतात. त्यात आपले अस्वच्छ हात त्यामुळे आपल्याला अनेक संसर्ग निर्माण होण्याची शक्यता असते. आपले घाणेरडे हात आपण आपल्या तोंडाला, नाकाला स्पर्श करतो त्यामुळे आपल्या शरीरात संसर्ग पसरतात. मग सर्दी, ताप, खोकला असे अनेक आजार निर्माण होतात. तर अशा आजारांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी दररोज 20 सेकंद हात धुणे गरजेचे आहे. जेणेकरून अशा गंभीर समस्यांचा आपल्याला सामना करावा लागणार नाही.

सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे अनेक संसर्ग निर्माण होताना दिसतात. बदलत्या वातावरणामुळे विषाणूजन्य रोगांचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे एकाकडून दुसऱ्याला आजार निर्माण होण्याची शक्यता असते. तर असे विषाणूजन्य आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने आपले हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्याला अशा विषाणूजन्य आजारांचा सामना करावा लागणार नाही.

प्रत्येकाने दररोज जेवणाआधी हात धुणे गरजेचे आहे. जर तुम्ही अस्वच्छ हाताने जेवण केले तर तुमच्या पोटात अनेक संसर्ग निर्माण होण्याची शक्यता असते. तुमच्या हातावर जंतू असतात तेच तुमच्या पोटात जातात त्यामुळे तुम्हाला अनेक पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये पोटदुखी, उलट्या मळमळ अशा अनेक समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. त्यामुळे कधीही कोणताही पदार्थ खाण्याअगोदर तुमचे हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे, जेणेकरून पोटाशी संबंधित समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागणार नाही.

spot_img

आणखी महत्वाच्या बातम्या

spot_img

आणखी वाचा

Skin Health News : आठवड्यातून किती वेळा स्क्रब करणे योग्य? जाणून घ्या!

मुंबई : आज-काल बहुतेक लोक त्यांच्या चेहऱ्याला आणि बॉडीला स्क्रबिंग करताना दिसतात. यामध्ये फक्त...

Health : अंड खाणं चांगलं पण या 3 लोकांसाठी हानिकारक, नक्की घ्या डॉक्टरांचा सल्ला

मुंबई : अंड हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. डॉक्टर देखील प्रत्येकाला अंड खाण्याचा...

Health : रोज खा फक्त 2 पेरू, ‘या’ गंभीर आजारावर ठरणार जालीम उपाय, जाणून घ्या!

मुंबई : पेरू हे फळ खायला बहुतेक लोकांना आवडते, हे फळ खायला गोड आणि...

Health : गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे शरीरासाठी घातक, दिवसभरात किती पाणी प्यावे?

मुंबई : पाणी पिणे शरीरासाठी खूप महत्वाचे आहे, पाण्याला जीवन असे नाव देण्यात आलेले...