शासन गुंतवणुकीसाठी विविध योजना आणत असते. विविध वयोगटासाठी वेगवेगळ्या योजना आहेत. दरम्यान आता शासनाच्या एका जबरस्त योजनेविषयी जाणून घेऊयात. ही योजना आहे राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना. जर तुम्हाला निवृत्तीनंतर एकरकमी पीएफ फंड मिळाला तर तुम्हाला या योजनेंतर्गत मोठा फायदा होऊ शकतो.
हा लाभ सरकारच्या राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजनेच्या खात्यावर उपलब्ध असेल. केंद्र सरकारने नुकतेच अर्थसंकल्पात पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी (POMIS) कमाल ठेव मर्यादा दुप्पट केली आहे.
यामध्ये आता एकल खात्यातून 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यातून 18 लाख रुपये जमा करता येणार आहेत. यापूर्वी ही मर्यादा 4.50 लाख आणि 9 लाख रुपये होती. परंतु आता यातील गुंतवणूक दुप्पट केल्याने तुमचे मासिक उत्पन्नही दुप्पट होईल.
व्याज कसे कॅल्युलेट केले जाते?
1 जानेवारीपासून या योजनेवर 6.7 टक्क्यांऐवजी 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. म्हणजेच व्याजदर देखील वाढवला आहे. यामध्ये जे व्याज मिळते ते 12 भागांमध्ये विभागले जाते आणि ते दर महिन्याला तुमच्या खात्यात येईल.
जर तुम्ही तुमच्या खात्यात हे व्याज घेतले नाही तर ते व्याजही मूळ रकमेत जोडले जाते आणि त्यावरही व्याज मिळते. या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षे आहे. परंतु हे तुम्हाला वाढवता देखील येते.
आता दर महिन्याला किती कमाई होणार
योजना: पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना
व्याज दर: 7.1 टक्के प्रतिवर्ष
संयुक्त खात्यातून जास्तीत जास्त गुंतवणूक: रु. 18 लाख
वार्षिक व्याज: 127800 रुपये
मासिक व्याज: 10650 रुपये
1 जानेवारी 2023 पूर्वी नफा किती फायदा मिळत होता
व्याज दर: वार्षिक 6.7 टक्के
संयुक्त खात्यातून गुंतवणूक: रु. 9 लाख
वार्षिक व्याज: 60300 रुपये
मासिक व्याज: 5025 रुपये