2023 New Maruti Suzuki Swift : मारुती सुझुकीची नवीन स्विफ्ट 2023 ही स्पोर्टी लूक आणि 35-40 किमी प्रति लीटर मायलेजसह येईल. नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट हायब्रिड इंजिन आणि नवीन तंत्रज्ञान आणेल. नवनवीन गाडयांना टक्कर देण्यासाठी ही गाडी सज्ज असेल. चला जाणून घेऊयात किंमत, फीचर्स ..
2023 New Maruti Suzuki Swift
2023 मध्ये स्पोर्टी लूकमध्ये लाँच करण्यात आलेली नवी मारुती सुझुकी स्विफ्ट हॅचबॅक हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. मारुती स्विफ्टमध्ये ब्लॅक आऊट ग्रिल, थिन हेडलॅम्प्स, एलईडी डीआरएल आणि मल्टी स्पोक अलॉय व्हील्ससह अनेक एक्सटर्नल फीचर्स देण्यात आले आहेत. स्पोर्टी आणि स्टायलिश लूकमध्ये सदर कार पाहायला मिळते. मारुती स्विफ्टच्या सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत नेक्स्ट जनरेशन अवतारात बरेच कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. यात ड्युअल टोन इंटेरिअर आणि लेदर सीट देण्यात आल्या आहेत. नवी मारुती सुझुकी स्विफ्टला नवा लूक मिळत आहे.
मारुती सुझुकीने हॅचबॅक सेगमेंटमध्ये स्विफ्ट लाँच केली
कंपनीने आपली प्रीमियम हॅचबॅक बलेनो , लोकप्रिय एसयूव्ही ब्रेझामध्ये 2022 मध्ये लाँच केली आहे. आता कंपनी आपली लोकप्रिय कार मारुती स्विफ्ट (मारुती स्विफ्ट २०२३) देशातील हॅचबॅक सेगमेंटमध्ये नव्या अवतारात लाँच करण्याची योजना आखत आहे.
स्ट्रॉन्ग हायब्रिड टेक्नॉलॉजीसह स्टायलिश डिझाइन आणि दमदार फीचर्स
कंपनी या वर्षी ही लोकप्रिय कार बाजारात सादर करेल, असे मानले जात आहे. मात्र त्याची चाचणी अजूनही सुरू आहे. कंपनीच्या या नव्या कारच्या इंजिन आणि लूकबाबत आता अनेक रिपोर्ट प्रसिद्ध झाले आहेत. या रिपोर्टनुसार कंपनी मारुती स्विफ्ट 2023 ला दमदार हायब्रिड टेक्नॉलॉजीसह बाजारात आणणार आहे.
मारुती सुझुकी स्विफ्टला मिळणार बेस्ट टेक्नॉलॉजीचे हे शानदार फीचर्स
कंपनी या नव्या कारला नवा आणि आकर्षक स्पोर्टी लूक देणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या कारमध्ये तुम्हाला पॉवरफुल इंजिनसोबत अनेक मॉडर्न फीचर्स पाहायला मिळतील. याचा लूक स्पोर्टी ठेवण्यात येईल, असे मानले जात आहे. फ्रंटवर तुम्हाला नवीन डिझाइन ग्रिल, नवीन एलईडी एलिमेंट्स तसेच स्लीक हेडलॅम्प्स, अपडेटेड फ्रंट बंपर, ब्लॅक-आऊट पिलर, व्हील आर्कवर फेक एअर व्हेंट आणि रूफ माउंटेड स्पॉइलर पाहायला मिळतील.
2023 New Maruti Suzuki Swift: इंजिन
मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये मारुती सुझुकीच्या नेक्स्ट जनरेशन इंजिन आणि पॉवरमध्ये ही नवीन बदल करण्यात आला आहे. मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये १.२ लीटर नेचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही मारुती स्विफ्ट कार ५ स्पीड मॅन्युअल आणि ५ स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह उपलब्ध आहे. नवी मारुती स्विफ्ट स्पोर्ट १.४ लीटर ४ सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह लाँच करण्यात आली आहे. जे ४८ व्ही माइल्ड हायब्रीड टेक्नॉलॉजीशी जोडलेले आहे.
2023 New Maruti Suzuki Swift: माइलेज
मारुती सुझुकी स्विफ्ट 2023 चे मायलेज नवीन हायब्रिड टेक्नॉलॉजीसह 35-40 किलोमीटर प्रति लीटर असू शकते.
2023 New Maruti Suzuki Swift: किंमत
कंपनी नवीन मारुती सुझुकी स्विफ्टची किंमत पूर्वीपेक्षा 1.50 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत जास्त ठेवू शकते. कारण त्यात हायब्रीड सिस्टीमचा वापर केला जाणार आहे. लाँचिंगबद्दल बोलायचे झाले तर कंपनी ही कार वर्ष 2023 च्या अखेरीस किंवा 2024 च्या सुरुवातीला बाजारात सादर करू शकते.