2G आणि 3G नेटवर्क बंद होणार ? Jio ने केली मागणी

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Relince Jio वेळोवेळी ‘टू जी फ्री’ भारताचीची घोषणा करत असते. आता जिओ कंपनीने केंद्र सरकारकडे अशी मागणी केली आहे की 2 जी आणि 3 जी चे नेटवर्क आता टप्प्याटप्प्याने बंद करण्यात यावे. ट्रायच्या कन्सल्टंट पेपरला उत्तर देताना कंपनीने ही माहिती दिली आहे. ट्रायने ‘डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन थ्रू फाइव्हजी इकोसिस्टम’साठी विचारणा केली होती.

यालाच उत्तर देताना जिओने लिहिले आहे की, सरकारकडून टू जी आणि थ्रीजी नेटवर्क बंद करण्याचे धोरण आखण्यात आले पाहिजे. मात्र, तसे करणे सरकार आणि कंपन्या दोघांनाही सोपे जाणार नाही.

३० कोटी लोक 2 जी / 3 जी नेटवर्क वापरतात
भारतात सध्या ३० कोटी मोबाइल युजर्स आहेत, जे २जी किंवा ३जी नेटवर्क वापरतात. एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल (भारत संचार निगम लिमिटेड) अजूनही 2 जी आणि 3 जी नेटवर्क वापरतात. अनेक युजर्सना सध्या 4जी किंवा 5जी नेटवर्कवर स्विच करायचे नाही. याचे कारण म्हणजे फीचर फोनचा वापर.

या प्रकरणी जिओने म्हटले आहे की, ‘सरकारने एक धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वे आणली पाहिजेत, ज्यात 2 जी आणि 3 जी नेटवर्क पूर्णपणे बंद असल्याची माहिती असेल. याच्या मदतीने अनावश्यक नेटवर्क खर्च टाळता येऊ शकतो आणि ग्राहक 4 जी आणि 5 जी नेटवर्ककडे स्थलांतरित होऊ शकतात. यामुळे 5 जी चा वापर आणि इकोसिस्टम सुधारण्यास मदत होईल.

जिओला काय फायदा होणार?
जिओची ही सेवा केवळ 4जी आणि 5जी नेटवर्कवर उपलब्ध आहे. इतर सर्व कंपन्यांचे युजर्स २जी/३जी नेटवर्क वापरतात. अशापरिस्थितीत टूजी/थ्रीजी नेटवर्क बंद झाल्याने जिओला मोठा फायदा होणार आहे. सिम अपग्रेड करताना अनेक युजर्स जिओच्या 4जी सेवेतही अपग्रेड करू शकतात. जिओ अनेक दिवसांपासून टूजी युजर्सला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

कंपनीने ४जी सपोर्टअसलेले फीचर फोनही लाँच केले आहेत. या फोनची किंमत सामान्य फीचर फोनइतकी आहे, पण येथे युजर्सकडे फक्त जिओची सेवा वापरण्याचा पर्याय आहे.

जर एखाद्या युजरने नॉन-जिओ 4जी फीचर फोन खरेदी केला असेल तर त्याला नेहमीपेक्षा दुप्पट किंमत मोजावी लागणार आहे. महागड्या फीचर फोनसाठी अजूनही मोठ्या संख्येने युजर्स तयार नाहीत. कारण त्यांचा मुख्य उपयोग फक्त कॉलिंग चा च असतो. अशावेळी त्यांना अधिक फीचर्स असलेल्या फीचर फोनची गरज समजत नाही.

जिओचा असा विश्वास आहे की 2 जी आणि 3 जी नेटवर्क बंद करणे 5 जी इकोसिस्टमच्या विकासाच्या बाजूने असेल. जिओने नुकताच ओईएम (ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर) च्या सहकार्याने जिओ भारत प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. याच्या मदतीने युजर्संना स्वस्त ४जी फीचर फोन मिळणार आहेत.