spot_img
Saturday, November 23, 2024
राष्ट्रीयअग्निपथ योजना! देशभर कौतुक पण इतक्या लहान वयात सेवेत गेल्यावर पदवीशिक्षणाचं काय?...

अग्निपथ योजना! देशभर कौतुक पण इतक्या लहान वयात सेवेत गेल्यावर पदवीशिक्षणाचं काय? वाचा.

spot_img

अग्निपथ योजना (Agneepath Scheme) लागू झाल्यापासून अनेक जण त्याचं कौतुक करत आहेत. पण असे अनेक लोक आहेत ज्यांनी या योजनेबाबत अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. याच प्रश्नातला एक प्रश्न असा की, एवढ्या कमी वयात उमेदवार सेनेत गेले तर त्यांच्या पुढील पदवी आणि पदव्युत्तर
शिक्षणाचं काय होणार? लष्करात राहून ते पदवीचे शिक्षण (Degree Education) कसे पूर्ण करतील? तसेच 4 वर्षांच्या सेवेनंतर ते परत आल्यावर त्यांना पुढील कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक ती पदवी मिळेल का? तर त्यासाठी एक मार्ग आहे. तो असा की अग्निवीरांच्या भविष्यातील शक्यता लक्षात घेऊन शिक्षण मंत्रालयातर्फे (Ministry Of Education) कौशल्याधारित तीन वर्षांचा पदवीपूर्व पदवी कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.

IGNOU विद्यापीठाशी करार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अग्निवीरद्वारे संरक्षण आस्थापनांमध्ये मिळणारं कौशल्य प्रशिक्षणही मान्य केलं जाणार आहे. अधिकाऱ्यांनी काल,बुधवारी ही माहिती दिली. अग्निवीरांच्या पदवीसारख्या पुढील शिक्षणासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाशी (IGNOU) करार करणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इग्नूने देऊ केलेल्या या पदवीला रोजगार आणि शिक्षणासाठी भारत आणि परदेशातही मान्यता दिली जाईल. त्यासाठी भारताचे लष्कर, हवाई दल आणि नौदल इग्नूसोबत सामंजस्य करार करणार आहे.
कार्यक्रम सक्तीने राबविण्यात येणार

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत (एनईपी) यूजीसी, नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क आणि नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कच्या निकषांनुसार हा कार्यक्रम सक्तीने राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाची चौकट अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (एनसीव्हीईटी) आणि युजीसी या संबंधित नियामक संस्थाही मान्यता देणार आहेत. पहिल्याच वर्षात जर हा पदवी अभ्यासक्रम सोडला तर अग्निवीरांना विद्यापीठाकडून ‘अंडर ग्रॅज्युएट सर्टिफिकेट’ दिले जाईल. त्याचबरोबर दुसऱ्या वर्षी यश मिळवल्यानंतर अभ्यासक्रम सोडल्यावर त्यांना ‘अंडर ग्रॅज्युएट डिप्लोमा’ देण्यात येणार आहे. तसेच एखाद्या सैनिकाने तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्याला विद्यापीठातर्फे पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या