सध्या राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. शिंदे गटाने बंड केल्याने शिवसेनेचे अनेक खंदे समर्थक शिंदे गटात गेले आहेत. आता उद्धवठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात दाखल झाले आहेत. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मागील तीन महिन्यांपासून कीर्तिकरांची चलबिचल सुरु होती. अखेर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला.
आता या प्रवेशानंतर आकडेवारी पाहिली तर शिंदे यांच्यासोबत असलेल्या लोकसभा खासदारांची संख्या १३ वर गेली आहे, तर राज्यसभेचे तीन खासदार धरुन ठाकरेंकडे 9 खासदार राहिले आहेत. दरम्यान गजानन किर्तीकर हे मागील काही दिवसांपासून द्विधा मनस्थितीत असल्याचं बोललं जात होत.
तसेच त्यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची भेट घेतल्याने चर्चाना अधिक उधाण आले होते. दरम्यान आता त्यांनी जाहीरपणेच शिंदे गटात गेले आहेत.