शेअर्समध्ये पैसे जबरदस्त पद्धतीने वाढू शकतात. परंतु यात रिस्क देखील असते. परंतु जर योग्य पद्धतीने अन तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक Investment केल्यास यातून करोडपती देखील बनता येऊ शकता.
असाच एक शेअर्स आहे की ज्याने अनेकांना करोडपती केले आहे. Samvardhana Motherson Shares ही ऑटोमोबाईल क्षेत्रातील Automobile Sector Copmany कंपनी आहे. 1 जून 1999 रोजी त्याचा शेअर फक्त 8 पैसे होता. त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 92560 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
आज म्हणजेच 19 जानेवारी 2023 रोजी 1.30 वाजता या कंपनीचा शेअर बीएसई Bombay Stock Exchange वर रु.73.85 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्यावेळी जर एखाद्या गुंतवणूकदाराने या कंपनीच्या शेअर्समध्ये 8 पैसे प्रति शेअर दराने 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याच्या शेअरची किंमत सुमारे 9.26 कोटी रुपये झाले असते.
कंसॉलिडेटेड रेवेन्यू Consolidated Revenue Growth वाढण्याची अपेक्षा आहे
BNP पारिबास ने स्टॉकवर खरेदीची शिफारस आहे. कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल 7 फेब्रुवारीला येऊ शकतात. वस्तूंच्या किमतीत नरमाईचा परिणाम झाल्याचे बीएनपीचे मत आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या मार्जिनवर दिसून येईल आणि एकत्रित महसूल वाढण्याची अपेक्षा आहे.
52 आठवड्यांचा उच्च आणि निम्न स्तर काय आहे
या कंपनीचा बाजारातील शेअर्स तो इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत वेगाने वाढला आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीचे एकत्रित एकूण उत्पन्न वाढले आहे. ते 3.62 टक्क्यांनी (YOY) वाढून रु.18354.82 कोटी झाली आहे. या कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 125.57 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 61.80 रुपये आहे.
टीप: गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. येथे गुंतवणुकीचा सल्ला दिला जात नाही, सदर माहिती ज्ञानावर आधारित आहे.