आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. जवळपास सर्व प्रकारच्या सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. मात्र, काही वेळा आधार कार्डमध्ये काही चुका झाल्या आहेत. सर्वात सामान्य चूक म्हणजे नाव किंवा त्याच्या स्पेलिंगमधील चूक.
अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा वापर केला जातो. अशापरिस्थितीत जर आधारमध्ये तुमच्या नावाचा स्पेलिंग योग्य नसेल तर तुम्ही सरकारी सुविधांचा लाभ घेण्यापासून वंचित राहू शकता. पण जर तुमच्या आधार कार्डमध्ये काही गडबड असेल तर तुम्ही घरी बसून ते ऑनलाइन दुरुस्त करू शकता. मात्र, यासाठी तुमच्याकडे आधार कार्डमध्ये नोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे. चला ही प्रक्रिया जाणून घ्या.
स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
आधार कार्डमधील आपले नाव दुरुस्त करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ssup.uidai.gov.in सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलला भेट द्यावी लागेल.
यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकून लॉग इन करावं लागेल.
यानंतर तुम्हाला सर्व्हिस सेक्शनमध्ये जाऊन ऑनलाइन अपडेट आधारवर क्लिक करावं लागेल.
त्यानंतर तुम्हाला नेम एडिट ऑप्शनवर जाऊन आपल्या नावाची स्पेलिंग दुरुस्त करावी लागेल. यानंतर सबमिटवर क्लिक करावं लागेल.
दरम्यान, आधार कार्डमधील नावात दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये चार्ज लागेल. हे शुल्क भरण्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करू शकता.