जर तुम्ही कोणतीही वस्तू ऑनलाईन ऑर्डर केली आणि त्यानंतर ती वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवली पण त्यात वस्तूऐवजी दोन हजाररुपयांची नोट आली तर ? तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल. मात्र, नोट तपासली तर ती नोट बनावट असल्याचे लक्षात आल्यावर मात्र तुमचा चेहरा निश्चितरच रागाने लाल होईल. बरोबर ना ? गेल्या काही दिवसांत लाखो लोकांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. स्विगी इन्स्टामार्ट या ग्रोसरी डिलिव्हरी वेबसाइटने हे काम केले आहे.
एका वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी स्विगीने दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा पाठवल्या होत्या. आता तुम्हाला या वेब सीरिजचं नाव माहित असेलच. तर त्या वेब सीरिजचं नाव आहे ‘फर्जी’. ही वेब सीरिज अमेझॉन प्राइमवर प्रसारित होते. या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी शाहिद कपूर आणि विजय सेतुपतीचे फोटो असलेल्या बनावट नोटा लोकांना पाठवण्यात आल्या आहेत. शाहिद कपूर आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत.
या वेब सीरिजचे कथानक बनावट नोटांवर आधारित आहे. शाहिद कपूर बनावट नोटा बनवणाऱ्याची भूमिका साकारत आहे. विजय सेतुपती हे अधिकारी आहेत. स्विगीचे मार्केटिंग हेड आशिष लिंगमनेनी म्हणाले, ‘प्राइम व्हिडिओसोबत काम करणे हा एक रोमांचक अनुभव होता. आम्ही स्विगी इन्स्टामार्टच्या ऑर्डरसह एक बनावट नोट पाठवली आहे जेणेकरून आमच्या शोची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. या आयडियाद्वारे हजारो इन्स्टंटमार्ट युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे असेही ते म्हणाले.