शासन सध्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. शेतीला पाणी अर्थात सिंचन व्यवस्थेसाठी देखील मोठा खर्च केला जात आहे. दरम्यान शासनाने राज्यात 2022-23 मध्ये ‘प्रति थेंब अधिक पीक’ घटकाच्या अंमलबजावणीसाठी 666 कोटी रुपये पैकी 2022-23 करिता सर्वसाधारण प्रवर्गाचा दुसरा हप्ता 130 कोटी रुपयांचा दिला आहे.
यात नगर जिल्ह्याच्या वाट्याला 33 कोटी 48 लाख 99 हजार 282 रुपयांचा निधी मिळणार आहे. या निर्णयामुळे नगर जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
पहिल्या हप्त्यात केंद्र शासनाने अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकर्यांना 20 कोटी, अनुसूचित जमातीमधील शेतकर्यांना 10 कोटी तर इतर शेतकर्यांसाठी 78 कोटी रुपये दिल्याचे समजते. तर राज्य सरकाने स्वतःच्या तिजोरीतून अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकर्यांना 8 कोटी रुपये, अनुसूचित जमातीमधील शेतकर्यांना 6.66 कोटी रुपये, तर इतर शेतकर्यांसाठी 52 कोटी रुपये दिले आहेत.
राज्यात केंद्र व राज्याचा मिळून आतापर्यंत 166 कोटींचा निधी यापूर्वीच देण्यात आलेला आहे. केंद्राने आता नव्याने दुसरा हप्ता 130 कोटी रुपयांचा पाठवल्याने दिलासा मिळाला आहे. सन 2020-21,2021-22 व 2022-23 मध्ये ज्या लाभार्थ्याची सुक्ष्म सिंचन घटकाअंतर्गत सोडतीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यापैकी मार्गदर्शक सुचनेप्रमाणे पुर्वसंमती मिळाल्यानतंर देयके अपलोड करुन व ज्यांची मोका तपासणी पूर्ण करुन अनुदान अदायगीसाठी शिफारस झाली आहे
अशा लाभार्थ्यांना अनुदान अदा करण्यासाठी जिल्हास्तरावर उघडण्यात आलेले सदर योजनेचे Child Account करीता खालीलप्रमाणे सर्वसाधारण प्रवर्गाकरीता अतिरिक्त निधी मर्यादा निश्चित करण्यात येत आहे. सदरचा निधी प्राथम्याने सन 2020-21 व 2021-22 मधील लाभार्थ्याकरीता खर्च करण्यात यावा असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.