spot_img
Tuesday, March 21, 2023
कृषीAloe Vera Farming : कोरफडीच्या शेतीमधून भरपूर कमाईची संधी,जाणून घ्या सविस्तर

Aloe Vera Farming : कोरफडीच्या शेतीमधून भरपूर कमाईची संधी,जाणून घ्या सविस्तर

spot_img

Aloe Vera Farming : शेती व्यवसायामध्ये आजकाल अनेक तरुण शेतकरी विविध कल्पना राबवत आहेत. विविध तंत्रज्ञांचा वापर करून शेतकरी भरघोस उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही देखील शेतीतून उत्पन्न कमवायचा प्रयत्नात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची ठरेल.

या ठिकाणी आपण कोरफडीच्या लागवडीबद्दल पाहुयात. कोरफडीची मागणी बाजारात नेहमीच असते. जर तुम्ही त्याची लागवड केली तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात या शेतीबद्दल.

कोरफडीला बाजारात नेहमीच मागणी
कोरफडीचा वापर फिटनेस, हर्बल उत्पादने, औषध आणि सौंदर्यप्रसाधने इत्यादींमध्ये केला जातो. अनेक मोठ्या कंपन्या आहेत ज्या जास्त किंमतीत कोरफड विकत घ्यायला तयार आहेत. कोरफडीची लागवड योग्य पद्धतीने होत नसल्याने त्यांना त्यांच्या मागणीनुसार चांगल्या प्रतीची कोरफड मिळू शकत नाही.

त्यामुळे आता कोरफडीची लागवड एक फायदेशीर शेती ठरू शकेल. कंपनीला ज्यापद्धतीने माल लागतो त्या पद्धतीने जर उत्पादन केले तर नक्कीच या माध्यमातून शेतकरी भरघोस उत्पन्न कमावू शकतो.

अशा प्रकारे करा कोरफडीची शेती
कोरफडीची लागवड करण्यासाठी जास्त पाण्याची गरज लागत नाही. तुम्ही कोरफडीची लागवड वालुकामय आणि चिकणमाती जमिनीतही करू शकता. कोरफडीची लागवड करत असाल तर अशी जमीन निवडावी जिथून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत असावा. कोरफडीची लागवड थंड भागात करता येत नाही. जर तुम्ही त्याची लागवड कोरड्या भागात केली तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

शेतीसाठी योग्य वेळ
शेती करण्यासाठी कोरफडीची रोपे लावावी लागतात. पावसाळा हा ऋतू कोरफड लागवडीसाठी योग्य आहे. तुम्ही फेब्रुवारी ते ऑगस्ट दरम्यान कधीही त्याची लागवड सुरू करू शकता. जर तुम्ही एक एकरमध्ये लागवड करत असाल तर तुम्ही त्यात सुमारे 10,000 रोपे लावू शकता. जमिनीचा पोत व इतर परिस्थितीनुसार यामध्ये बदल करता येऊ शकतो.

हे हि वाचा

जाहिरात

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Healthy Snack: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते ब्रोकोली, स्नॅकमध्ये करा अशा प्रकारे समावेश

How To Make Broccoli Pakoda: ब्रोकोली ही कोबीसारखी हिरवी भाजी आहे जी प्रथिने, कॅल्शियम, लोह, जस्त, सेलेनियम, व्हिटॅमिन-ए आणि सी सारख्या गुणधर्मांचा साठा आहे....

Health Tips : चहा चपातीचा नाश्ता करणे सर्वात हानिकारक का आहे, चला सविस्तर जाणून घेऊया

Health Tips : चहा आणि चपाती हा अनेकांचा आवडता नाश्ता आहे. पण तुम्हाला माहित आहे का की चहासोबत चपाती खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचे ही अनेक...

Health Tips : Heart Attack पासून वाचण्यासाठी खाव्यात या 4 गोष्टी

Health Tips : हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जसजसे वय वाढत जाते तसतसे आपले अवयव कालांतराने बिघडत जातात. आपण जे खातो...

पोटनिवडणूक : चिंचवडमध्ये भाजप समर्थकांमध्ये व अपक्ष उमेदवारात बाचाबाची , पोलिसांसमोर मारहाण

ही पोटनिवडणूक महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदार संघात मोठमोठ्या प्रचारकांनी प्रचार केला आहे. ही निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची...

लग्न झालेल्यांना मोठा धक्का, मोदी सरकार 1 एप्रिलपासून बंद करणार ही योजना, दरमहिन्याला मिळणार नाही पैसे!

Pension Scheme: सरकारने लोकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत, जेणेकरून केवळ लहान मुलेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांनाही योजनांचा लाभ घेता येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना...
जाहिरात