Alto price : प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, आपल्याकडेही चारचाकी गाडी असावी. सर्वसामान्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही वर्षांपूर्वी टाटांनी नॅनो आणली, पण ती फोल ठरली. मारुतीची ऑल्टो तेव्हा सर्वाधिक खपली जात होती. पण आता तेही सर्वसामान्यांच्या हातात राहिली नाही.
काही महिन्यांपूर्वी या ऑल्टोचे नवीन व्हर्जन आले आहे. मारुतीने ऑल्टो 800 आणि 1000 सीसी च्या पर्यायात आणले आहे. ऑल्टो 800 ने एसटीडी (ओ), एलएक्सआई (ओ), वीएक्सआई और वीएक्सआई+ सह पांच वेरिएंट आणले आहेत. याची एक्स शोरूम किंमत 3.54 लाख रुपये आणि एक्स-शोरूम 5.13 लाख रुपये आहे. म्हणजेच साधी ऑल्टो आता सहा लाखांना उपलब्ध होत आहे. ऑल्टो के10 चे चार ट्रिम्ससह सात व्हेरियंट आहेत.
या कारची एक्स शोरूम किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होऊन 5.95 लाख रुपयांपर्यंत जाते. मारुती सुझुकी ऑल्टो ही एंट्री लेव्हल हॅचबॅक आहे, जी CNG ऑप्शनमध्येही उपलब्ध आहे. ऑल्टो 800 च्या पेट्रोल व्हेरियंटचे मायलेज 22.05 किमी प्रति लीटर आणि सीएनजी व्हेरियंटचे मायलेज 31.59 किमी प्रति किलो पर्यंत आहे.
मारुती ऑल्टो के10 पेट्रोल व्हेरियंटचे मायलेज 24.39 किमी प्रति लीटर आणि सीएनजी व्हेरियंटचे मायलेज 33.85 किमी/लीटर आहे. Maruti Suzuki Alto K10 Std व्हेरिएंटची किंमत 3.99 लाख रुपये, LXi व्हेरिएंटची किंमत 4.82 लाख रुपये, व्हीएक्सआय व्हेरिएंटची किंमत 5.04 लाख रुपये आहे. के10 व्हीएक्सआय प्लस व्हेरियंटची किंमत 5.33 लाख रुपये, के10 व्हीएक्सआय एटी व्हेरिएंटची किंमत 5.59 लाख रुपये, के10 व्हीएक्सआय प्लस एटी व्हेरिएंटची किंमत 5.88 लाख रुपये,
के10 व्हीएक्सआय एस-सीएनजी व्हेरियंटची किंमत 5.95 लाख रुपये आहे. Maruti Suzuki Alto 800 ची किंमत एसटीडी ऑप्ट व्हेरिएंटची किंमत 3.54 लाख रुपये, एलएक्सआय ऑप्ट व्हेरिएंटची किंमत 4.23 लाख रुपये, व्हीएक्सआय व्हेरिएंटची किंमत 4.43 लाख रुपये, व्हीएक्सआय प्लस व्हेरिएंटची किंमत 4.57 लाख रुपये आणि एलएक्सआय ऑप्ट एस-सीएनजी व्हेरिएंटची किंमत 5.13 लाख रुपये आहे.