spot_img
Sunday, October 13, 2024
टेक्नोलाॅजीApple ने लाँच केला iOS 16, लॉक स्क्रीनपासून नोटिफिकेशनपर्यंत होणार बदल, जाणून...

Apple ने लाँच केला iOS 16, लॉक स्क्रीनपासून नोटिफिकेशनपर्यंत होणार बदल, जाणून घ्या..

spot_img

Apple ने स्मार्टफोनमध्ये (Smartphone) iOS 16 हा नवा फोन (New Phone) लाँच केला आहे. iOS 16 या स्मार्टफोनमुळे आता आयफोनमध्ये (iPhone) अनेक बदल वापरकर्त्यांना पहायला मिळतील. कोणताही नवा फोन आला की त्यात नवे फिचर्स असतातच. iOS 16 यामध्ये सगळ्यात मोठा बदल म्हणजे यातली लॉक स्क्रिनमध्ये आहे. हा आयफोनसाठी एक नवा अपडेट सॉप्टवेअर आहे. अ‍ॅपलनं म्हटलं की, या अपडेटनंतर आयफोनला वापरणं अधिकच सुलभ होणार आहे. यानंतर आपल्याला अगदी सहज आयफोन वापरता येऊ शकतो. फोन दिसण्यात आणि त्याच्या काम करण्याच्या पद्धतीत काही नवीन बदल दिसून येतायेत. अ‍ॅपलनं बिल्ट इन अ‍ॅपमध्ये देखील काही बदल केले आहेत. याचं उदहारण द्यायचं झाल्यास, मॅसेज अ‍ॅपमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता सेंटमध्ये मॅसेजला undo केलं जाऊ शकतं. त्यामध्ये एडिट करण्याची सुविधा देखील असणार आहे.

जाणून घ्या नवे बदल
कंपनीने म्हटलं की, लॉक स्क्रीनमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे. यासह त्याच्या पद्धतीत देखील अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. अ‍ॅपलने फोनमध्ये एक नवं अ‍ॅप्शन अ‍ॅड केलं आहे. तो लॉक स्क्रीन कसा दिसणार, याला सेट करता येईल. यामध्ये नवा टाइपफेस दिला आहे. यासह वेळेच्या कलरमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. यामधये यूजर्स स्पेशल भेटीलाही अ‍ॅड करू शकतात. यामाध्यमातून कॅपच्या लाईव्ह माहितीसारखे कामं देखील सहज सोपे होऊ शकतात. आयफोनच्या या नव्या फोनमध्ये एक नव्या प्रकराचं नोटिफिकेशन दिलं आहे. कंपनीनं याला लाईव्ह अ‍ॅक्टिव्हिटीस असं नाव दिलं आहे. यामध्ये वर्क आऊट, उबर राइड सारख्या गोष्टी केल्या जाऊ शकतात.

वेगवेगळ्या लॉक स्क्रीन ठेवता येणार
लॉक स्क्रीन फोकस टूल सोबत देखील काम करणार आहे.याला मागच्या वर्षी iOS सोबत लाँच केलं होतं. यूजर्स फोकसच्या आधारे वेगवेगळ्या लॉक स्क्रीन ठेऊ शकतात. उदाहरण द्यायचं झाल्यास जेव्हा तुम्ही कुठे कामावर असाल तेव्हा स्पेसिफिक सेट तुम्ही निवडू शकतात. कंपनीने बिल्ट इन अ‍ॅपमध्ये पण मोठे बदल केले आहेत. यामध्ये तुम्हाला मुख्य म्हणजे मॅसेज अ‍ॅपमध्ये मोठा बदल दिसेल. आता एका पाठवलेला मॅसेज तुम्ही हटवू पण शकता आणि त्याला एडिटही करू शकतात. यासह त्याला अनरीडच्या स्वरुपात मार्कही केला जाऊ शकतो. यामध्ये शेअरप्लेमध्ये देखील बदल केला जाऊ शकतो.

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या