Apple MacBook Air M1 : तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा असेल तर ही बातमी महत्वाची आहे. Apple MacBook Air M1 वर सध्या आकर्षक ऑफर्स मिळत आहेत. हे लॅपटॉप तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून स्वस्तात खरेदी करू शकता.
होय हे खरे आहे. चला जाणून घेऊयात –
हे लॅपटॉप Croma वर सर्वोत्तम डील अंतर्गत उपलब्ध आहे. Apple हा लॅपटॉप Apple Laptop अधिकृतपणे 99,900 रुपयांना विकत आहे, परंतु तुम्ही फ्लिपकार्ट किंवा क्रोमा Apple Laptop Flipkart and Croma वरून स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्ही क्रोमाकडून Apple MacBook Air M1 हा 70 ते 80 हजार रुपयांना खरेदी करू शकता. पॉवरफुल फीचर्स असलेला हा Apple लॅपटॉप एक उत्तम पर्याय आहे. या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या ऑफरचे तपशील जाणून घेऊयात.
.
MacBook Air M1 किती रुपयांना मिळेल?
Apple च्या ऑनलाइन स्टोअरवर जर तुम्ही पाहिलं तर MacBook Air M1 लॅपटॉप 99,900 रुपये किंमतीला लिस्टेड आहे. क्रोमा वरून तुम्ही ते 83,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता. ग्राहकांना 16 हजार रुपयांची सूट मिळत आहे.
जर तुमच्याकडे HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड Hdfc Bank Credit Card असेल तर तुम्हाला अधिक फायदे मिळू शकतात. HDFC बँकेच्या कार्डांवर 10,000 रुपयांची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे. यानंतर तुम्ही हा लॅपटॉप 73,900 रुपयांना खरेदी करू शकाल. या संपूर्ण डीलमध्ये तुम्हाला 26 हजार रुपयांची सूट मिळेल.
स्पेसिफिकेशन्स काय आहेत? Apple MacBook Air M1 Specification
कंपनीने हा डिवाइस 2020 मध्ये लॉन्च केला होता. यामध्ये तुम्हाला 13.3 इंचाचा डिस्प्ले मिळेल. डिव्हाइस LED-Backlit सह येते. तुम्हाला त्यात M1 चिपसेट मिळेल. लॅपटॉप 8GB रॅम आणि 256GB SSD स्टोरेजसह येतो.
Apple MacBook Air M1 लॅपटॉप Mac OS वर काम करतो. यात 720P कॅमेरा आहे. एका चार्जमध्ये तुम्ही 13 तासांपर्यंत बॅटरी लाइफ मिळवू शकता.