बॉलीवूड अभिनेता अरबाज खान गेल्या अनेक वर्षांपासून मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डेट करतोय. जॉर्जिया अँड्रियानी ने तिच्या या अरबाज खान सोबतच्या रिलेशनशिपबद्दल नेहमीच शांतता बाळगली आहे. आपल्या वयक्तिक आयुष्याबद्दल प्रसार माध्यमांमध्ये झालेली चर्चा तिला आवडत नाही. अलीकडेच प्रसारमाध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत मॉडेल जॉर्जिया पहिल्यांदाज बॉयफ्रेंड अरबाज बद्दल आणि त्याच्या कुटुंबीयांसोबतच्या नात्याबद्दल सर्वांसमोर व्यक्त झाली. एवढंच नाही तर अरबाज खानची एक्स-बायको मलायका अरोराबद्दलही तिने पहिल्यांदाच आपलं मत व्यक्त केलं.
मॉडेल जॉर्जिया अँड्रियानी आणि अरबाज खान गेल्या ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. २०१९ पासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा यांना डिनर करताना, फिरायला किंवा पार्ट्यांना जाताना पाहिलं गेलंय. अरबाज आणि मालयकाचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला आहे.
मलायकाशी अरोराशी कधी तुझी भेट झाली आहे का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “होय, अनेकदा. मला ती खूप-खूप आवडते आणि मला तिच्या प्रवासाविषयी खूप आदर आहे. मालयकाने शून्यापासून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. मॉडेलिंग करत हळूहळू तिने इथपर्यंतचा प्रवास गाठला आहे . त्यासाठी तिला माझ्याकडून सलाम. माझ्यासाठी मलायका अशी व्यक्ती आहे, जिच्या कामाबद्दल मला खूप आदरआहे.”
अरबाजच्या कुटुंबीयांबद्दल बोलताना अँड्रियानी पुढे म्हणाली, “ते खूप चांगले आहेत. बॉयफ्रेंड अरबाज खानचे कुटुंबीय खुल्या विचारांचे असून सहजतेने दुसऱ्याला स्वीकारणारे आहेत. माझा खान कुटुंबीयांसोबतचा सोबतचा आतापर्यंतचा अनुभव खूप भारीआहे.”
अरबाज आणि जॉर्जिया यांच्या वयात २२ वर्षांचं अंतर आहे. याविषयी अरबाजने एका मुलाखतीत मौन सोडलं होतं. “आमच्या दोघांच्या वयामध्ये खूप मोठं फरक आहे.
दुसरीकडे मलायका ही अर्जुन कपूर सोबत डेट करतेय. या दोघांच्या वयातही बरंच अंतर आहे. घटस्फोटानंतरही अरबाज खान आणि मलायका अरोरा त्यांच्या मुलांसाठी अनेकदा एकत्र येताना दिसत असतात.