spot_img
Sunday, October 13, 2024
महाराष्ट्रजेल बाहेर येताच संजय राऊतांनी तासाभरातच केले 'हे' धक्कादायक काम

जेल बाहेर येताच संजय राऊतांनी तासाभरातच केले ‘हे’ धक्कादायक काम

spot_img

शिवसेना नेते संजय राऊत हे काल जेलमधून बाहेर आले. परंतु बाहेर येताच त्यांनी पुन्हा रुद्रावतार घेतल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत जामीन मिळाल्यानंतर घरी जातील अन काही दिवसानंतर ऍक्टिव्ह होतील असे वाटत होते.

परंतु त्याबाहेर येताच लगेचच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कारण बाहेर येताच तासाभरातच त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधण्याचे काम केले आहे. त्यांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा डिवचलं आहे.

ते म्हणाले की, ‘100 दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात होतो. तुरुंगात अशी परिस्थिती असते, बाहेर काय चाललंय कळत नाही. साधनं नसतात. आता पाहतोय की बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा कणा तुटलेला नाही. ती चालतेय धावतेय हे मी पाहतोय.

शिवसैनिक लढणारा माणूस आहे. माझं अख्खं आयुष्य बाळासाहेब, उद्धव ठाकरेंसोबत गेलं आहे. एकच शिवसेना खरी आहे, ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची. बाकी सगळ्या धोतऱ्याच्या बिया आहेत, कडू’, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा गेली 30-35 वर्षांपासून फडकत आहे. तो तसाच फडकत राहणार. जे हात लावतील ते जळून जातील असा इशाराही त्यांनी दिला आहे.

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या