बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धारेंद्र शास्त्री मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे ते चर्चेत आलेले होते. आता त्यांचे गुरुवर्य रामाभद्राचार्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात भाकीत केले आहे.
त्यांच्या भाकितानुसार 2024 मध्ये पीएम मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असे म्हटले आहे. त्यामुळे आता त्यांचे भाकीत खरे होणार का यावर चर्चा सुरु झाल्या आहेत. जगद्गुरू रामभद्राचार्य यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.
त्यात आवाज येत आहे की, तुम्ही कोणतीही कसर सोडली नाही, लाठीचार्ज झाला आणि माझा जीव वाचला असे म्हणताना ऐकू येत आहे. किमान भाजपने मला पद्मविभूषण देऊन माझ्या गुणवत्तेचा आदर केला. माझ्या शब्दाचे पालन करून राम मंदिर बांधले.
मी पुन्हा भविष्यवाणी करत आहे. पीएम मोदी तिसऱ्यांदाही येणार आहेत आणि यावेळीही अनेक मोठी कामे करायची आहेत. गोहत्या बंद करून हिंदीला राष्ट्रभाषा बनवायला हवी असे यात म्हणताना दिसत आहेत. मागील काही दिवसांमध्ये धीरेंद्र शास्त्री हे चर्चेत आले होते. सोशल मीडिया, मीडिया आदींमध्ये त्यांच्याच चर्चा होत्या.
त्यांच्या विविध व्हिडिओंविषयी वेगवेगळी मते मंडळी जात होती. अनेकांनी आक्षेप घेतले तर अनेकांनी त्यांचे समर्थन केले. धीरेंद्र शास्त्री यांना मानणारा मोठा वर्ग आहे. याचप्रमाणे यावेळी त्यांचे गुरु रामभद्राचार्य यांनी देखील धीरेंद्र शास्त्री यांचे समर्थन केले होते.