अनेकांना पर्यटनाची हौस असते. अनेक लोक पर्यटनासाठी गोव्याला जातात. तेथील निसर्ग सौंदर्य अनेकांना आकर्षित करते. परंतु आता सरकारने एक नवीन नियम जाहीर केला आहे.
त्यामुळे गोव्याला जाण्यापूर्वी हा नियम एकदा वाचाच. गोव्यातील पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेता शासनाने नियम बनवला आहे. त्याचे उल्लंघन केल्यास हजारो रुपयांचा दंड होईल.
एका रिपोर्टनुसार यात असे म्हटले आहे की, पर्यटकांसोबत छायाचित्रे काढण्यापूर्वी किंवा त्यांचे वैयक्तिक फोटो काढण्यापूर्वी त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. विशेषत: जेव्हा ते उन्हात सागरी किनारी झोपत असतील किंवा समुद्रात मजा करत असतील तेव्हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोपनीयतेचा आदर केला जाणार आहे.
या नियमात पुढे असेही म्हटले आहे की, खुल्या ठिकाणी अन्न शिजवू नये तसे झाल्यास 50,000 रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो. त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यावर दारू पिणाऱ्यांवरही कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अनेकांना धोकादायक ठिकाणी उभे राहून सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही.
त्यांच्यासाठी या ठिकाणी सेल्फी न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला तेथे हॉटेलमध्ये राहायचे असेल तर पर्यटन विभागाकडे नोंदणीकृत हॉटेलमध्ये राहावे असाही सल्ला देण्यात आला आहे. गोवा पर्यटन विभागाने 26 जानेवारी रोजी ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी हे करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांनी गोव्याला जाण्याआधी या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे.