Fixed Deposit हा पैशांच्या गुंतवणुकीसाठी सर्वात लोकप्रिय अन गुंतवणुकीसाठी पर्याय आहे. यामध्ये व्याजदराच्या माध्यमातून खात्रीशीर नफाही मिळवता येतो. दरम्यान आता HDFC Bank बँकेने आपले फिक्स डिपॉझिटवरील व्याजदर वाढवले आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने रेपो रेट वाढवून तो 6.25 पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे बँकांनीही आपले FD दर वाढवले आहेत. जाणून घेऊयात एचडीएफसी बँकेने ( HDFC Bank) व्याजदरात किती वाढ केली आहे.
एफडी रेट्स एचडीएफसी बँक Fixed Deposit Rate Hdfc Bank
HDFC बँकेने 24 जानेवारीपासून त्यांच्या FD योजनांवरील व्याजदरातही सुधारणा केली आहे. 1 वर्षापासून ते 15 महिन्यांपर्यंतच्या FD वर 10 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. या मुदतीवर बँक सर्वसामान्य नागरिकांना 6.60 टक्के व्याज देत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.10 टक्के व्याज देत आहे.
एचडीएफसी बँक सर्वसामान्य नागरिकांना 15 महिने ते 21 महिन्यांच्या मुदतीच्या FD वर 7 टक्के व्याज देत आहे. यासोबतच बँक 21 महिने ते 2 वर्षे कालावधी, 2 वर्षे ते 3 वर्षे, 3 ते 5 वर्षे आणि 5 वर्षे ते 10 वर्षे कालावधीसाठी 7 टक्के व्याजदर देत आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी किती आहे FD व्याज
HDFC बँक ज्येष्ठ नागरिकांना 15 महिने ते 21 महिन्यांच्या कालावधीच्या FD वर 7.5 टक्के व्याज देत आहे. 21 महिने ते 2 वर्षे कालावधी, 2 वर्षे ते 3 वर्षे, 3 वर्षे ते 5 वर्षे मुदतीवर 7.5 टक्के व्याज देत आहे.
प्रीमेच्योर विड्रॉल
FD मुदतपूर्व बंद केल्यास 1 टक्के दंडाच्या स्वरूपात कमी केला जाईल.