UPI Transaction Limit : सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. अनेक आर्थिक व्यवहार हे ऑनलाईन अर्थात कॅशलेस होत आहेत. ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी Google Pay, फोन पे (PhonePe), Amazon Pay (Amazon Pay) , Paytm आदींचा वापर करत असतात. परंतु आता
या कंपन्यांनी दररोजचे व्यवहार करण्यासाठी मर्यादा निश्चित केली आहे, ज्यामुळे देशातील करोडो UPI वापरकर्त्यांवर परिणाम होईल. NPCI कडून या संदर्भात अधिसूचना जारी करून माहिती देण्यात आली आहे.
दररोज किती व्यवहार करता येतील ते जाणून घेऊयात –
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता तुम्ही UPI द्वारे दररोज फक्त 1 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकता. त्याच वेळी, काही छोट्या बँकांनी ही मर्यादा 25,000 पर्यंत निश्चित केली आहे. आता कोणत्या ऍपद्वारे तुम्ही दररोज किती पैसे पाठवू शकता त्यावर एक नजर टाकुयात –
Amazon Pay
Amazon Pay ने UPI द्वारे पेमेंटची कमाल मर्यादा 1 लाख रुपये निश्चित केली आहे. तसेच युजरच्या बँकेच्या आधारावर दररोज 20 व्यवहारांची संख्या निश्चित केली आहे.
Paytm
Paytm UPI ने त्यांच्या यूजर्ससाठी 1 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा निश्चित केली आहे. यासह पेटीएमने प्रति तास मर्यादा देखील हस्तांतरित केली आहे. पेटीएमने सांगितले आहे की आता तुम्ही दर तासाला फक्त 20,000 रुपयांचे व्यवहार करू शकता. याशिवाय एका तासाला 5 व्यवहार करता येतात आणि एका दिवसात फक्त 20 व्यवहार करता येतात.
PhonePe
PhonePe ने देखील दररोजची मर्यादा 1 लाख दिली आहे. याशिवाय, बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एखादी व्यक्ती PhonePe UPI द्वारे दररोज जास्तीत जास्त 10 किंवा 20 व्यवहार करू शकता.
Google Pay
Google Pay ने दिवसभरात एकूण १० व्यवहारांची मर्यादा सेट केली आहे. तसेच या द्वारे एक लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकणार आहेत