शाहरुख खान बाबत एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. तो नेहमीच विविध गोष्टींनी चर्चेत राहतो. आता शाहरुखची जवळपास तासभर चौकशी झाल्याचेवृत्त समोर आले आहे.
त्याचे झाले असे की, शाहरुख खान आणि त्याच्या टीमला शुक्रवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने अडवले. सुमारे तासाभराच्या चौकशीनंतर शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी विमानतळावरून बाहेर पडताना दिसले, मात्र किंग खानचा अंगरक्षक रवी आणि टीमने कस्टमने पकडले.
दुबईहून परतत असताना त्याला मुंबई विमानतळावर रोखण्यात आले तसेच त्याची चौकशी झाली. शाहरुखला रात्री उशिरा मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागानं नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी थांबवलं होतं.
शाहरुख खानची लाखो रुपयांची घड्याळे भारतात आणणे, बॅगेत महागड्या घड्याळांचे रिकामे बॉक्स सापडणे आणि कस्टम ड्युटी न भरल्याबद्दल चौकशी करण्यात आली. कस्टम विभागाच्या चौकशी आणि कारवाईत शाहरुखने सहकार्य केल्याचे समोर आले आहे.
पहाटे 12.30 च्या सुमारास विमानतळाच्या T3 टर्मिनलवरील रेड चॅनल ओलांडत असताना सीमा शुल्क अधिकाऱ्यांना शाहरुख आणि त्याच्या टीमच्या बॅगमध्ये सुमारे 18 लाख रुपयांची महागडी घड्याळे सापडली. बॅगेत अनेक घड्याळांचे रिकामे बॉक्सही होते. या सर्वांची सीमा शुल्क न भरल्यामुळे शाहरुख आणि त्याच्या टीमला चौकशीसाठी बसवण्यात आले.