Guatam Adani Net Worth: जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सर्वात श्रीमंत भारतीय उद्योजक गौतम अदानी यांचे स्थान या यादीत घसरले आहे. अदानी ग्रुपच्या शेअर्स मधील जोरदार घसरणीमुळे टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट असेलेले भारतीय उद्योजक गौतम अदानी सातव्या क्रमांकावर घसरले आहेत. ते या यादीत चौथ्या क्रमांकावर होते.
आता लॅरी एलिसन 112.8 अब्ज डॉलर्स संपत्तीसह चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर गौतम अदानी 100.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सातव्या क्रमांकावर घसरले आहेत.
अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल (Hindenburg Report)) अदानी ग्रुपला भारी पडत आहे. रिपोर्ट अल्यापासून , गौतम अदानी Gautam Adani यांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांच्या (अडाणी स्टॉक) शेअर्स मध्ये त्सुनामी आली आहे आणि ते मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. शेअर्सच्या जोरदार घसरणीचा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या नेटवर्थवरही वाईट परिणाम झाला आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीश निर्देशांकात सध्या चौथ्या स्थानावर असलेले गौतम अदानी अचानक सातव्या क्रमांकावर घसरले आहेत (Gautam Adani 7th Richest Person).
गौतम अदानी यांचे मोठे नुकसान
2022 मध्ये जगातील टॉप-10 (Top-10 Billionaires) अब्जाधीशांमध्ये गौतम अदानी हे सर्वाधिक कमाई करणारे उद्योगपती होते. यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यात तो यशस्वी झाला, पण नवीन वर्ष 2023 भारतीय उद्योगपतींसाठी अत्यंत वाईट ठरत आहे. वर्षाच्या सुरुवातीला सर्व काही ठीक होते, परंतु 24 जानेवारीला अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल आला आणि अदानी समूहाचे नुकसान होऊ लागले. अदानी समूहाचे मार्केट कॅप अवघ्या दोन दिवसांत 2.37 लाख कोटी रुपयांनी घटले. यामुळे गौतम अदानी यांची एकूण संपत्तीही Gautam Adani Net Worth) $100.4 अब्ज इतकी कमी झाली आहे