चहा पिण्याचे अनेक शौकीन आहे. सध्या चहामध्ये देखील अनेक प्रकार पाहायला मिळतात. ग्रीन टी, मसाला टी आदी. परंतु तुम्हाला ब्ल्यू टी बद्दल माहित आहे का? होय आजकाल या चहाची क्रेझ प्रचंड वाढत चालली आहे.
कारण याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. हा चहा अपराजिताच्या फुलांपासून तयार होतो. या फुलांना काही ठिकाणी गोकर्णाची फुले असेही म्हणतात. चला जाणून घेऊयात या चहाने आरोग्यासाठी होणारे फायदे.
बीपी नियंत्रण
उच्च रक्तदाब अर्थात हाय बीपी असणाऱ्यांना मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत, बीपी नियंत्रित ठेवण्याबरोबरच, आपल्या रक्तवाहिन्या आणि हृदयाचे कार्य निरोगी ठेवणे महत्वाचे आहे. या कामात ही फुले उपयोगी पडू शकतात.
हाय बीपीमध्ये त्याचा चहा प्यायल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. या फुलांच्या चहामध्ये त्यात असणाऱ्या व्हॅसोरलेक्सेशन गुणधर्मांद्वारे रक्तदाब कमी करू शकतो. ते तुमच्या रक्तवाहिन्या रुंद करण्यास मदत करते किंवा रक्ताभिसरण वाढवण्यासाठी मदत होते.
मूड बूस्टर
ज्यांना खूप काळजी वाटते, सातत्याने चिंतीत आता त्यांच्यासाठी या फुलांचा चहा खूप फायदेशीर आहे. याने तुम्हाला ताजेतवाने वाटेल. त्यानंतर ते तुमची चिंता कमी करते. त्यानंतर ऊर्जा पातळी आणि तग धरण्याची क्षमता वाढते. याचा एकप्रकारे मूड बूस्टर म्हणून उपयोग होतो.
पचनक्रिया सुधारते
ब्ल्यू चहा शरीरातील अँटीऑक्सिडंट्स वाढवते. हे मुक्त रॅडिकल्सच्या कृतीपासून शरीराचे संरक्षण करते आणि पेशी निरोगी ठेवते. त्याने पोटाचा मेटाबोलिक रेट वाढतो. अशा प्रकारे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा रिकाम्या पोटी एक कप ब्ल्यू चहा प्यायल्याने तुम्हाला विषारी पदार्थ बाहेर काढण्यात आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते.
(हा लेख सामान्य माहितीसाठी आहे, कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)