प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत अनेक कंपन्या विविध ऑफर देत आहे. अनेक गॅजेट्स वर सूट देऊन कंपन्या त्या कमी किमतीला विकतात. दरम्यान आता Lava कंपनीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मोठी ऑफर आणली आहे.
हियरेबल Earbuds ब्रँड Probuds तर्फे एक शानदार ऑफर सुरू केली आहे. सदर सेल केवळ एकच दिवस असणार आहे. विशेष म्हणजे या सेलमध्ये इयरबड्स Probuds २१ अवघ्या २६ रुपयांत तुम्हाला खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे हा कंपनीचा लेटेस्ट ट्रू वायरलेस बड्स आहे. कंपनीचा स्टॉक जो पर्यंत आहे तो पर्यंत ही ऑफर असणार आहे. स्टॉक संपताच ही ऑफर देखील समाप्त होईल.
उद्या हे इयरबड्स खरेदी करायचे असतील तर तुम्हाला कंपनीच्या Lava Stores या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर जावे लागेल. अमेझॉनवर देखील तुम्हाला ही ऑफर मिळेल. येथेही अवघ्या २६ रुपयांत हे इयरबड्स खरेदी करता येतील. २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता हा सेल सुरू होणार आहे. परंतु तुम्हाला स्टॉक संपायच्या आत या ऑफरमधून खरेदी करावी लागणार आहे.
Lava Probuds २१ इयरबड्स मधील बॅटरीचा विचार केला तर ६०mAh ची मोठी बॅटरी यात देण्यात आली आहे. यामध्ये ७५ ms अल्ट्रा-लो लेटेंसी सोबत शानदार गेमिंग एक्सपीरिएंसही मिळतो. या इयरबड्समध्ये १२mm डायनॅमिक ड्रायवरचा वापर केला गेला आहे. विशेष म्हणजे या इयरबड्स मध्ये न्वॉइज आइसोलेशन फीचर देखील देण्यात आल्याचे समजते.