Income Tax : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये आयकराबाबत अनेक बदल केले गेले. या बदलांमुळे हा अर्थसंकल्प चर्चेत राहिला. परंतु यात जे काही बदल झाले आहेत ते सर्व नवीन करप्रणालीत करण्यात आले आहेत.
नवीन आयकर प्रणाली अंतर्गत स्लॅब देखील बदलले आहेत. परंतु यात एक मोठी खेळी झाली आहे. यामुळे आता तुम्ही 1 रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळवले तर तुम्हाला 25000 रुपये कर भरावा लागेल. जाणून घेऊयात नेमके काय आहे –
नवीन कर प्रणाली अंतर्गत हा नवीन कर स्लॅब
प्रथम नवीन कर प्रणाली अंतर्गत नवीन कर स्लॅब काय आहेत ते जाणून घेऊ. नवीन कर प्रणालीमध्ये, 3 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर आकारला जाईल. तसेच 6 लाख ते 9 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के कर आकारला जाईल. 9 लाख ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15 टक्के कर आणि 12 लाख ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर लागणार आहे. शेवटी, 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर भरावा लागेल.
काय आहे 1 रुपयाचा खेळ
अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, नवीन कर प्रणालीमध्ये 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल. परंतु जर तुमचे उत्पन्न 7 लाख रुपयांपेक्षा 1 रुपयांनी देखील जास्त झाले तर 25,000 रुपये कर आकारला जाईल. आता तुमच्या मनात दोन प्रश्न उभे राहिले असतील.
पहिला असा की, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल तर मग 3 ते 6 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर का आकारला जात आहे ? तर त्याचे उत्तर असे की, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. परंतु जर तुमचे उत्पन्न 7 लाख रुपयांपेक्षा 1 रुपयाने देखील जास्त असेल तर मात्र तुम्हाला 25000 टॅक्स लागेल.
दुसरा प्रश्न तुम्हाला असा पडेल की, 1 रुपये जरी उत्पन्न जास्त झाले तर 25000 रुपये कर कसा लावला जाईल ? तर या प्रकरणात तुमचे 3 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल. 3 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% दराने 15000 रुपये आयकर आकारला जाईल. दुसरीकडे, 6 लाख ते 7 लाख रुपये घेतल्यास, 1 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10,000 रुपयांचा आयकर 10 टक्के दराने होईल. अशा प्रकारे, जर उत्पन्न 7 लाख रुपयांवरून 1 रुपयांनी वाढले, तर 25,000 रुपये कर भरावा लागेल.