अर्थमंत्री निर्मला सीतारामन Finance Minister Nirmala Sitharaman यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर कला. यात त्यांनी आयकर सवलतीची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार 7 लाख रुपयांच्या उत्पन्नावर आता आयकर लागू होणार नाही. परंतु आता हे जाणून घेणे गरजेचे आहे की, याचा फायदा नेमका कुणाला होणार. याबद्दल काही तज्ज्ञांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊयात
सर्वात म्हत्वाची एक गोष्ट जाणून घ्या की, आयकर सवलतीबाबत जी काही घोषणा करण्यात आली आहे ती फक्त त्यांच्यासाठीच आहे जे आयकराच्या नवीन प्रणाली अंतर्गत रिटर्न भरतील.
डिटेल जाणून घ्या
जर एखाद्याचे उत्पन्न 7 लाख रुपये असेल आणि त्याने नवीन प्रणाली अंतर्गत रिटर्न फाइल केले तर त्याचे संपूर्ण उत्पन्न करमुक्त असेल. दुसरीकडे, जर त्याने जुन्या पद्धतीनुसार रिटर्न भरले तर त्याचे फक्त 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त मानले जाईल.
नवीन प्रणालीनुसार 3 लाख रुपयांचा आयकर पूर्णपणे मोफत करण्यात आला आहे. पण जर तुमच्या मनात प्रश्न असेल की जेव्हा 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे , तर मग 3 लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त असण्याचा अर्थ काय? तर त्याचे असे आहे की, जेव्हा तुमचे उत्पन्न सात लाखांपेक्षा जास्त झाले तर 3 लाखांपर्यंतची सूट तुम्हाला लागू होईल.
असा असेल नवीन इन्कम टॅक्स स्लॅब
नवीन कर प्रणाली अंतर्गत, 2023-24 या आर्थिक वर्षात आयकर स्लॅबमध्ये बदल करण्यात आला आहे, जो पुढीलप्रमाणे असेल.
3 लाख ते 6 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5% कर
6 लाख ते 9 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10% कर
9 लाख ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15% कर
12 लाख ते 15 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20% कर
याशिवाय 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर