Budget 2023 Halwa Ceremony Today : गुरुवारी बजेट तयार करण्यापूर्वी हलवा सेरेमनी साजरी करण्यात येईल. हलवा तयार करण्याची मोठी अन पूर्वापास चालत आलेली ही प्रथा आहे. बजेट सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री हलवा तयार करून वाटप करतात. मध्यंतरी ब्रेक लागलेला हा हलवा सोहळा यंदा होणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते हलवा सोहळा होईल. पण अर्थ बजेट सादर करण्यापूर्वी का केला जातो हलवा ? काय आहे परंपरा ? चला जाणून घेऊयात याविषयी
हलवा समारंभ का असतो?
भारतात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी तोंड गोड करण्याची परंपरा आहे. त्याचप्रमाणे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री हलवा समारंभ करतात. त्याचे कारणही तेच आहे. अर्थसंकल्पापूर्वी हलवा समारंभ आयोजित करून तोंड गोड केले जाते. यावर्षी हलवा सोहळा २६ जानेवारीला म्हणजेच गुरुवारी होणार आहे.
अधिकारी वित्त मंत्रालयातच राहतील
26 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व अधिकारी अर्थमंत्रालयातच राहतील. अर्थसंकल्पाची अत्यंत गोपनीय कागदपत्रे तयार करताना त्यात सहभागी असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जवळपास 10 दिवस बाह्य जगापासून दूर केले जाते. अर्थसंकल्पाची गुप्तता राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून ते सार्वजनिक केल्यानंतरच या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांना किंवा अन्य नातेवाईकांना भेटण्याची परवानगी दिली जाते.