Budget 2023 : आज सर्वांच्याच नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या होत्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेला आहे. यामध्ये सर्वच क्षेत्राविषयी तरतूद केली आहे. दरम्यान काही तज्ज्ञांनी यावर काही प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांचे काय म्हणणे हे ते जाणून घेऊयात –
सकारात्मक आणि ग्रोथ ओरिएंटेड बजेट
शांती एकंबरम हे कोटक महिंद्रा बँकेचे संचालक आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सकारात्मक आणि विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर केला आहे. तसेच तज्ज्ञ नीलेश शाह यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प बाहुबली अर्थसंकल्प आहे. 2026 च्या आर्थिक वर्षाने ठरवलेल्या मार्गाने हे साध्य झालेले आहे.
सामाजिक,आर्थिक विकासासाठी सर्वसमावेशक उपाययोजना
टाटा कॅपिटलचे एमडी आणि सीईओ राजीव संभरवाल यांनी सांगितले की सर्वसमावेशक सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी या अर्थसंकल्पात अनेक उपाययोजना आहेत. सरकारने आपल्या 7 प्राधान्यक्रमांसह आणि वित्तीय क्षेत्र आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करून योग्य दिशेने वाटचाल केली आहे.
तंत्रज्ञानावर आधारित क्रांतीसाठी प्लॅटफॉर्म
Veeruts Wellness Solutions चे संस्थापक आणि अध्यक्ष संजीव नायर यांनी सांगितले की सदर अर्थसंकल्पाने आरोग्य आणि कल्याण क्षेत्रात तंत्रज्ञान-आधारित क्रांतीच्या नवीन युगाची सुरुवात होईल. त्यादृष्टीनेच हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. ऍक्सिस सिक्युरिटीजचे एमडी आणि सीईओ यांच्या म्हणण्यानुसार ग्रामीण कल्याण आणि कृषी क्षेत्रावर पुरेसे लक्ष केंद्रित करून भांडवली खर्चावर आधारित विकासावर केंद्रित हा अतिशय संतुलित अर्थसंकल्प आहे.