Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज म्हणजेच 1 फेब्रुवारी 2023 रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या बजेटकडे सर्वांचेच डोळे लागून होते. या अर्थसंकप्लनुसार आता काही वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत तर काही महागणार आहेत. चला जाणून घेऊयात त्याविषयी सविस्तर..
या गोष्टी झाल्या स्वस्त
सायकल, खेळणी, ऑटोमोबाईल, काही मोबाईल फोन, इलेक्ट्रिक व्हीकल, एलईडी टीव्ही, देसी किचन चिमणी, हिऱ्यांचे दागिने, कॅमेरा लेन्स तसंच बायोगॅसशी संबंधित गोष्टी स्वस्त झाल्या आहेत.
या गोष्टी महाग झाल्या
डायमंड, एक्स-रे मशिन, दारू, प्लॅटिनम, छत्री, सिगारेट, परदेशी किचन चिमणी, सोने तसेच आयात चांदीच्या वस्तू महाग झाल्या आहेत.
कृषी स्टार्टअप्ससाठी फंड
तरुण शेतकऱ्यांना शेती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कृषी प्रवेगक निधीची स्थापना केली जाईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. अर्थमंत्र्यांनी कृषी कर्जाच्या उद्दिष्टात 20 लाख कोटी रुपयांची वाढ केली आहे. वित्तमंत्र्यांच्या वतीने पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि दुग्धव्यवसायावर लक्ष केंद्रित करून कृषी कर्जाचे लक्ष्य वाढविण्यात आले असून ते 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.