ही पोटनिवडणूक महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदार संघात मोठमोठ्या प्रचारकांनी प्रचार केला आहे. ही निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. दरम्यान आज निवडणुकीच्या दिवशी गालबोट लागले आहे. चिंचवडमध्ये सकाळी सकाळीच अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांत आणि भाजपाच्या माजी नगरसेवकांत हाणामारीचा प्रकार घडला आहे.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे समर्थक गणेश जगताप आणि भाजपचे माजी नगरसेवक सागर आंघोळकर यांच्यात मरः झाल्याचे वृत्त आहे. सांगवी परिसरातील एका मतदान केंद्रावर ही घटना घडली. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना बाजूला पांगवले.
जगताप यांनी भाजप कार्यकर्त्यांना मतदान केंद्रावर १०० मीटरच्या आत का थांबले , अशी विचारणा केली. त्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. यावरून हाणामारी झाली. पोलिस आयुक्त काकासाहेब डोळे म्हणाले की, तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल आणि शहरात मतदान सुरळीत सुरू आहे.
महाराष्ट्रामध्ये या पोटनिवडणुकीच्या चर्चा आहे. कारण सर्वच पक्षांनी या पोटनिवडणूक प्रतिष्ठेच्या केल्या. भाजप विरोधात महाविकास आघाडी असेच सध्याचे चित्र आहे. दरम्यान आता या निवडणुकीनंतर येणाऱ्या निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.