Causes Of Excessive Thirst: अनेकदा असं होतं की कितीही पाणी प्यायलं तरी तहान भागत नाही. अनेकदा रात्री उशिरा तहान लागल्याने झोप मोडते. जर तुम्हालाही असे होत असेल तर या मागची करणे समजावून घ्या. यामागे काही आजाराची लक्षणे देखील आढळतात. आज याठिकाणी तुम्हाला वारंवार तहान लागण्याची कारणे सांगणार आहोत.
त्यांना वेळीच ओळखून तुम्ही तुमचं आरोग्य बिघडण्यापासून रोखू शकता, तर जाणून घेऊयात जास्त तहान लागण्याची कारणं काय आहेत.
जास्त तहान लागण्याची कारणे
मधुमेह Diabetes
जर आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले तर आपले शरीर लघवीद्वारे ही साखर बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. यामुळे तुम्हाला वारंवार लघवी करावी लागते, ज्यामुळे तुमच्या शरीरातून पाणीही वारंवार बाहेर पडू लागते. यामुळे आपल्याला वारंवार तहान लागते.
रक्तदाब Blood Pressure
जर तुमचा रक्तदाब वाढला असेल तर यामुळे तुमच्या शरीरातून घाम येतो, ज्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकतं. अशावेळी तुम्ही कितीही पाणी प्यायले तरी तुमची तहान भागत नाही. उच्च रक्तदाबाची समस्या हे वाईट जीवनशैलीचे लक्षण आहे. अशावेळी उच्च रक्तदाबाबरोबरच शरीरात पाण्याचीही कमतरता भासते.
डिहायड्रेशन Dehydration
डिहायड्रेशन ही एक समस्या आहे जी आपल्या शरीरात पाण्याची कमतरता दर्शवते. शरीरात पाण्याची कमतरता कमी पाणी पिण्यामुळे किंवा पाणी न पिण्यामुळे होते. अशावेळी तुम्ही कितीही पाणी प्यायले तरी तुमची तहान भागत नाही. अशावेळी डिहायड्रेशन दूर करण्यासाठी शक्यतो साधे पाणी, फळांचा रस आणि नारळाच्या पाण्याचे सेवन करावे.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. महाटुडे ने याला दुजोरा दिलेला नाही.)