आताचे जग अत्यंत स्मार्ट होत चालले आहे. आता गावागावातही वाय-फाय पोहोचले आहे. काही दिवसांत गावागावांत ५ जी सारखे जाळेही उपलब्ध होणार आहे. पण तुमचा टीव्ही स्मार्ट नसेल तर? त्यासाठी खूप पैसे खर्च होतात का? पण आता स्मार्ट टीव्ही सात हजारात येत आहेत. आज एका कंपनीने हा स्मार्ट टीव्ही देशात लाँच केला आहे.
सीडी प्लेअरच्या माध्यमातून भारतात प्रवेश करणारी जर्मन कंपनी Blaupunkt ने हा स्वस्त टीव्ही लाँच केला आहे. 24 इंचाच्या या टीव्हीमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. हा टीव्ही ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध करण्यात आला आहे.
महत्त्वाचं म्हणजे त्याचा खूप उपयोग होतो. म्हणजे टीव्ही कॉम्प्युटर मॉनिटर म्हणूनही याचा वापर करता येतो. कंपनीने सांगितले की, हे 3-इन-1 डिव्हाइस आहे जे मॉनिटर, स्मार्ट फीचर्स एक्सपीरियंस आणि टेलिव्हिजन म्हणून वापरले जाऊ शकते.
Blaupunkt चा हा स्मार्ट टीव्ही 7,499 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. मात्र, कंपनी सध्या यावर सूट देत आहे. हा स्मार्ट टीव्ही 6,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. 7 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत ही विक्री होणार आहे. 24 इंचाच्या या टीव्हीमध्ये एचडी रेडी डिस्प्ले आहे. यात 20 वॅटचा साउंडआऊट देण्यात आला आहे. फायरिंग स्पीकरसह सराउंड साउंड तंत्रज्ञान देण्यात आले आहे.
हे पीसी, मोबाइल फोन आणि लॅपटॉप ला सपोर्ट करते. यूट्यूब, प्राइम व्हिडिओ, झी 5, वूट आणि सोनी लिव्हसाठी डेडिकेटेड शॉर्टकट देखील या रिमोटमध्ये उपलब्ध आहेत. Blaupunkt TVमध्ये 512एमबी रॅम आहे. याशिवाय यात 4 जीबी रॉम देण्यात आला आहे. डिस्प्लेसाठी डिजिटल नॉइस फिल्टर आणि ए प्लस पॅनेल देण्यात आले आहे.