नवी दिल्ली : मोदी सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, 1 एप्रिल 2023 पासून वाहनांसाठी नवीन आणि प्रगत एमिशन नॉर्म्स (BS6 Emission Norms) लागू केले जातील. या अंमलबजावणीनंतर या नियमांचे पालन करू न शकणाऱ्या अनेक वाहन कंपन्या आपल्या लोकप्रिय कार बंद करणार आहेत.
नवीन उत्सर्जन मानदंडांना रिअल ड्रायव्हिंग एमिशन म्हणून देखील ओळखले जाते. १ एप्रिलपासून लागू होणाऱ्या या नव्या नियमाला BS6 एमिशन नॉर्म्सचे फेस 2 असेही म्हटले जाते.
नवीन एमिशन नॉर्म्स काय आहेत?
सरकारने ठरवून दिलेल्या नव्या एमिशन नॉर्म्सनुसार कार उत्पादकांना नव्या नॉर्म्सनुसार त्यांची उपलब्ध मॉडेल्स अपडेट करावी लागतील. नव्या नियमांनुसार कार उत्पादकांना वाहनाशी संबंधित सर्व माहिती द्यावी लागणार आहे. मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, होंडा, स्कोडा, रेनो आणि ह्युंदाई च्या काही मॉडेल्स नवीन नियमांचे पालन करू शकणार नाहीत.
परिणामी कंपन्या त्यांच्या मॉडेल्सवर सूट देत आहेत. कंपन्यांचा जुना साठा संपवत आहेत. तसेच नवीन उत्सर्जन निकषांमध्ये न बसणाऱ्या मॉडेल्सचा स्टॉक संपवण्यासाठी कंपनी १० ते ११ टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. काही कंपन्यांनी आपली वाहनेही डिसकंटिन्यू केली आहेत.
या गाड्या होणार बंद
Renault ची ८०० सीसीची क्विड कार आणि होंडाचे अमेज डिझेल व्हेरियंट कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून हटवण्यात आले आहेत. दोन्ही वाहने डिस्कंटीन्यू करण्यात आली आहेत. होंडा लवकरच डब्ल्यूआर-व्ही, होंडा सिटी जनरेशन 4 आणि जॅझचे उत्पादन मार्च 2023 पर्यंत बंद करणार आहे. ह्युंदाई लवकरच i20 च्या डिझेल व्हेरियंट डिस्कंटीन्यू करू शकते.
कंपनीने यापूर्वीच ग्रँड Grand i10 Nios आणि Aura चे डिझेल मॉडेल बंद केले आहे. मारुती सुझुकी लवकरच काही मॉडेल्स डिसकंटिन्यू करू शकते. 1 एप्रिल 2023 पासून येणाऱ्या नव्या आरडीई नॉर्म्समध्ये न बसणाऱ्या गाड्या यापुढे बाजारात दिसणार नाहीत. त्यामुळे येत्या काळात ऑल्टो ८००, सियाज आणि इग्निस सारख्या गाड्यांची विक्री बंद होऊ शकते.
महिंद्राची अल्टुरस जी ४ बंद करण्यात आली आहे. निसान इंडिया सुद्धा १ एप्रिल २०२३ पर्यंत आपली सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार Kicks ला डिस्कंटीन्यू करू शकते. स्कोडा सुद्धा 2023 पर्यंत आपल्या Skoda Octavia आणि Superb ला बंद करू शकते.