प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देऊन राज्यातील युवकांमधील ऊर्जा, धाडस, सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाचा वेग यांचा वापर करून प्रशासकीय प्रक्रियेला गती देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रमाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
तरुणांनी फेलोशिपसाठी अर्ज करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देण्यासाठी तंत्रज्ञानाची ऊर्जा, धाडस, सर्जनशीलता आणि गती यांचा वापर करून प्रशासकीय प्रक्रियेला गती देणे हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना धोरण निर्मिती, नियोजन, कार्यक्रमांची अंमलबजावणी या क्षेत्रातील महत्त्वाचा अनुभवही मिळतो. त्यांच्या ज्ञानाचे आणि अनुभवाच्या कक्षा रुंदावतात . २०१५ ते २०२० या कालावधीत हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. आता हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फेलोशिप 2023 चे निकष काय आहेत?
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी मंगळवारपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील २४ दिवसांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च आहे
मुख्यमंत्री फेलोशिप २०२३ मध्ये घेण्यात येणार आहे.
अर्ज करण्याचे वय २१ ते २६ वर्षे असावे.
किमान निकष ६०% गुणांसह पदवी आणि एक वर्षाचा कार्यानुभव असा आहे
ऑनलाइन परीक्षा, निबंध व मुलाखत अशा त्रिस्तरीय चाचणीच्या माध्यमातून गुणवत्तेच्या आधारे फेलोंची निवड केली जाईल.
आलेल्या अर्जांमधून ६० युवक मुख्यमंत्री फेलो म्हणून निवडले जातील
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या विविध विभाग व राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये हे फेलो वर्षभर काम करतील.
खालील कागदपत्रांची आवश्यकता
दहावी, बारावी, पदविका, पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या गुणवत्तापत्रक
अनुभवाची प्रमाणपत्रे
छायाचित्र व स्वक्षारीची स्कॅन प्रत
पत्त्याचा पुरावा
खालील तारखा लक्षात ठेवा
अर्जाचा कालावधी – ७ फेब्रुवारी, २०२३ ते २ मार्च, २०२३
मॉक परीक्षा – ३ मार्च, २०२३ ते ५ मार्च, २०२३
ऑनलाईन परीक्षा – ४ आणि ५ मार्च २०२३
अटी व शर्ती
– मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा पूर्णवेळ कार्यक्रम असून फेलोशिप कालावधीत फेलोंना इतर नोकऱ्या, खाजगी प्रॅक्टिस, असाइनमेंट किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम (आयआयटी, मुंबई आणि आयआयएम नागपूर यांनी फेलोशिपसाठी तयार केलेले विशेष अभ्यासक्रम वगळता) स्वीकारता येणार नाहीत.
– 12 महिन्यांच्या या कार्यक्रमात केवळ एकदाच सहभाग घेता येईल आणि मुदतवाढ किंवा पुनर्नियुक्तीची कोणतीही तरतूद नाही.
– 12 महिन्यांच्या कालावधीनंतर, हा कार्यक्रम कोणत्याही नोकरीची हमी देत नाही.
– फेलो ज्या प्राधिकरणासोबत काम करेल, त्या प्राधिकरणाच्या कामाच्या वेळा फेलोसही लागू राहतील
– फेलोंना कामाच्या गरजेनुसार अधिक तास काम करावे लागेल किंवा प्रवास करावा लागेल.
– फेलोच्या मुलाखतीवेळी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय आणि ओळखपत्राशी संबंधित कागदपत्रांची छाननी केली जाईल. फेलोंनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. नियुक्तीनंतर फेलोंची पोलीस पडताळणी केली जाणार आहे.
– फेलोशिपच्या कालावधीत जेथे नेमणूक केलेली आहे त्या शहर व जिल्ह्यामध्ये फेलोस वास्तव्य करावे लागेल.
– फेलोंच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार नाही
– ऑफर लेटर प्राप्त होण्याच्या दिवशी फेलोंना ठरलेल्या ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक असेल. अन्यथा त्यांची नियुक्ती रद्द करण्यात येईल.
– फेलोशिप कालावधीत फेलो कोणत्याही राजकीय चळवळीत भाग घेऊ शकणार नाही
निवड प्रक्रिया
टप्पा १
भाग 1: ऑनलाइन चाचणी
भाग २ : सर्वाधिक गुणांच्या आधारे स्टेज २ साठी २१० उमेदवारांची निवड
टप्पा 2
भाग १ : निवडलेले उमेदवार निबंध अपलोड करतील
भाग २ : मुलाखत (निबंध अपलोड करणार्या शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना लागू)
भाग 3 : निवडलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे