spot_img
Sunday, October 13, 2024
व्यापार-उद्योगCIBIL Score: उत्तम CIBIL स्कोअर म्हणजे स्वस्त कर्जाची हमी, विमा कंपन्या देखील...

CIBIL Score: उत्तम CIBIL स्कोअर म्हणजे स्वस्त कर्जाची हमी, विमा कंपन्या देखील ते पाहतात

spot_img

तुम्हाला कर्ज (Loan) किंवा क्रेडिट कार्ड (Crdit Card) हवं असेल तर तुम्ही कोणत्याही बँकेत Bank गेल्यास. कोणतीही वित्तीय संस्था किंवा बँक सर्वात प्रथम तुमचा सिबिल स्कोर पाहते. Bank किंवा Finance कंपनीकडून किती कर्ज मिळेल व त्याला किती व्याजदर असेल हे तुमच्या सिबिल स्कोर वर अवलंबुन असते,

तुमचा सिबिल स्कोर जितका जास्त असेल तितका तुम्हाला कमी व्याजदर बँक आकारते, जास्त Cibil Score असेल तर कर्ज जलदगतीने उपलब्द होते, खराब Cibil असल्यावर कर्ज मिळवणे अवघड असते व मिळाले तरीही वित्तीय संस्था त्या कर्जावर जास्त व्याज आकारतात.

Cibil Score मध्ये तुमची सर्व वैयक्तिक माहिती, नोकरीचे तपशील, किती बँकेत या पूर्वी कर्जासाठी प्रोसेस केली ते, बँक खाती, जुने कर्ज तपशील असतात.
आजकाल विमा कंपन्याही तुमचा सिबिल स्कोर पाहतात. सिबिल स्कोर ० ते ९०० दरम्यान असतो.

सिबिल स्कोअर चांगला/वाईट
550 खूप वाईट
550-650 खराब
650-750 सरासरी
750 पेक्षा चांगले
750-900 सर्वोत्तम

व्यावसायिक घटकांसाठी, CIBIL स्कोअर 1 ते 10 पर्यंत असतो. एक सर्वोत्तम मानला जातो, तर 10 गुण सर्वात वाईट मानले जातात.

आजपर्यंत तुमचा कोणताही कर्जाचा इतिहास नसेल किंवा तुम्ही कोणत्याही बँक किंवा NBFC किंवा फिनटेक कंपनीकडून कर्ज घेतले नसेल तर तुमचा CIBIL स्कोर शून्याच्या खाली जाईल. तुम्ही वेळेवर कर्जाची नियमित परतफेड केल्यास, CIBIL स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असेल.

या चार एजन्सी तयार करतात स्कोअर
आरबीआयने CIBIL स्कोअरशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी चार एजन्सींना अधिकृत केले आहे. सिबिल, एक्सपेरियन, इक्विफॅक्स आणि हायमार्क्स. या संस्था बँका, NBFC, फिनटेक कंपन्या अशा विविध स्रोतांकडून कर्ज घेणे, कर्जाची परतफेड करणे यासह माहिती गोळा करतात. यावर आधारित, CIBIL स्कोअर तयार केले जातात.

कर्ज घेण्यासाठी तुम्ही बँका किंवा वित्तीय संस्थांकडे किती वेळा चौकशी केली हेही संस्था पाहतात.
व्यावसायिक संस्थेचे लेखापरीक्षकही न्यायालयात प्रलंबित प्रकरणांसारखी माहिती गोळा करतात.
कर्जाचा हफ्ता वेळेवर भरा. हप्ता चुकणार नाही याची योग्य व्यवस्था करा.
तुमच्या कमाईच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त कर्ज म्हणून घेऊ नका.
कर्जासाठी वारंवार अर्ज करू नका आणि त्यासाठी कोणाला मंजुरी देऊ नका.
गरजेनुसार कर्ज घ्या. आकर्षक ऑफर आणि आकर्षक व्याजामुळे कर्ज घेऊ नका.
दीर्घ कालावधीसाठी कर्ज घ्या. यामुळे हप्ता देखील कमी होईल, ज्यामुळे परतावा करणे सोपे होईल.

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या