भावी शिक्षकांमध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची उत्सुकता लागली आहे. परंतु आता या परीक्षेसाठी सुरु असणारी अर्ज प्रक्रियेची मुदत आज अर्थात ८ फेब्रुवारीरोजी संपनार आहे. त्यामुळे आता अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षक पात्रता व बुद्धिमत्ता चाचणीचे अर्ज भरण्याची मुदत वाढवण्याची मागणी
केली आहे. राज्यात पाच वर्षांनंतर शिक्षक पात्रता व बुद्धिमत्ता चाचणीचे (टीएआयटी) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया ३१ जानेवारीपासून सुरू झाली आहे. ऑनलाइन प्रवेश परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत होणार आहे. परंतु या परीक्षेसाठी बसणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अनेकनै ही जाहिरात उशिरा पाहिली आहे. तसेच काहींना तांत्रिक गोष्टीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांनी अर्ज भरण्याची मुदत वाढवावी यासाठी मागणी केली आहे.
सदर भरती प्रक्रियेची परीक्षा पाच वर्षांपूर्वी झाली होती. परंतु तीच प्रकिया अर्धवट राहिली आहे. त्यामुळे त्या जाहिरातीचे आता काय होणार याकडे देखील अनेकांचे लक्ष लागले आहे. २०१७ मध्ये राज्य सरकारने पवित्रपोर्टल संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार डिसेंबर २०१७ मध्ये ‘टीएआयटी’ परीक्षा महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन घेण्यात आली.
पाच वर्षे ही परीक्षा घेण्यात आली नव्हती. पाच वर्षे परीक्षा न घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप होता. अनेक वर्षांपासून उमेदवार परीक्षेच्या प्रतीक्षेत होते. राज्यात टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. २०१७ पासून आतापर्यंत ५० हजारांहून अधिक उमेदवार पात्र ठरले आहेत. राज्यातील हजारो डीएड आणि बीएड विद्यार्थी २०१७ ते २०२१ या कालावधीत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) उत्तीर्ण झाले आहेत.