मद्यपान करणे शरीरासाठी हानिकारक आहे. यामुळे अनेक जण दारूपासून दूर राहतात. पण बिअर पिणं शरीरासाठी वरदान ठरू शकतं असं जर तुम्हाला कुणी सांगितलं तर? यावर कुणी विश्वास ठेवू शकत नाही. पण काही संशोधकांचा असा दावा आहे की बिअर पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. परंतु बहुतांश तज्ज्ञांचे मत असे आहे की बीअरमुळे शरारीरास तोटाच होतो. बिअरमध्ये अल्कोहोल असते आणि इतर मादक पेयांपेक्षा कमी हानिकारक मानले जाते. येथे आपण दोन्ही मुद्दे जाणून घेऊयात –
बियरचे हे होतात फायदे
-हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, 355 मिली बिअर कॅनमध्ये 153 कॅलरीज असतात. यात खनिजे आणि जीवनसत्त्वे देखील असतात.
-काही संशोधनात असेही दिसून आले आहे की बिअर पिण्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
-बिअरमध्ये अल्कोहोल असते, जे रक्तातील साखर काही प्रमाणात नियंत्रित करण्यास मदत करते.
-काहींच्या म्हंणण्यासार मधुमेहाच्या रुग्णांसाठी बिअर फायदेशीर मानली जाते.
-महिला आणि पुरुषांच्या हाडांना बळकटी देण्यासाठी कमी प्रमाणात बिअरचे सेवन उपयुक्त असल्याचे सांगितले जाते.
बिअरमुळे होणारे नुकसान
-बिअरमध्ये अल्कोहोल असल्याने मद्यपान केल्यामुळे व्यक्तीचा लवकर मृत्यू होण्याची शक्यता असते.
-वारंवार बिअर प्यायल्याने व्यसन लागण्याची शक्यता असते. हे व्यसन आरोग्यासाठी चांगले नाही.
-जास्त बिअर मुळे यकृत खराब होऊ शकते
-बिअरच्या एका कॅनमध्ये १५३ कॅलरीज असतात. त्यामुळे वजन वाढू शकते.
-अल्कोहोलच्या सेवनामुळे घसा आणि तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
(सूचना : बिअर असो की इतर काही मद्यपान हे शरीरास हानिकारक असते. ते प्यायल्याने शरीरास हानीच होते. त्यामुळे ते पिऊच नये. येथे दिलेली माहिती ही केवळ दोन गटातील वादावर आधारित आहे )