भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजना सरकार राबवत असते. केंद्रा प्रमाणेच राज्य शासनानेही अनेक सुविधा सुरु केल्या आहेत. दरम्यान राज्य सरकार देखील आता ड्रॅगन फ्रुट साठी अनुदान देत आहे. जाणून घेऊयात त्याबद्दल सविस्तर
ड्रॅगन फ्रूट सध्या मार्केटमधील डिमांड वाढणारे फळ आहे. या फळांची अनेक भागात सध्या लागवड केली जाते. महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या 10 ते 15 वर्षांपासून ड्रॅगन फ्रूटची लागवड करत आहेत. आता ड्रॅगन फ्रूटची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
महाराष्ट्रातही ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी 1 लाख 60 हजार हेक्टरवर अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी अनुदान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर करावा लागेल.
किती असेल सबसिडी ?
एक हेक्टर क्षेत्रात ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी चार लाख रुपये खर्च निश्चित करण्यात आला आहे. शासन मग यापैकी 40 टक्के अनुदान देते. अर्थातच 1 लाख 60 हजार रुपये शासन अनुदान देते. हे अनुदान तीन टप्प्यात शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.
जाणून घ्या अनुदानचे टप्पे ?
एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेंतर्गत ही अनुदानाची योजना राबवली जाते. पहिल्या टप्प्यात 96 हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात 20 टक्के तर तिसऱ्या टप्प्यात 20 टक्के अनुदान दिले जाणार आहे. ड्रॅगन फ्रुट शेती अनुदान मिळविण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर 0.20 हेक्टर जमीन असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येते.