Health Benefits Of Eating Raisins: मनुके आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. कारण यात भरपूर प्रमाणात लोह, प्रथिने आणि कॅल्शियम असते. मनुक्या मुळे हाडेही मजबूत होतात, पण मनुके नीट खाल्ले नाहीत तर ते आरोग्यालाही धोखा पोहोचवू शकतात. ह्या गोष्टीमुळे आज आम्ही तुम्हाला इथे मनुके खाण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया मनुके खाण्याची योग्य पद्धत.
आपल्या जेवणात मनुक्यांचा असा करा समावेश
मनुके आणि पाणी
मनुके पाण्यात भिजवून खाल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. मनुके खाण्यासाठी १५ मनुके घेऊन एक कप पाण्यात रात्रभर भिजत ठेवून सकाळी उठल्यावर या मनुक्यांचे सेवन करा. अश्या पद्धतीने मनुके खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होतेच पण त्याचबरोबर आपल्या शरीरालाही ऊर्जा मिळते.
मनुका आणि दूध
मनुके दुधात भिजवून ठेवून खाल्ल्याने त्याचे फायदे अनेक पटींनी वाढतात. दुधात भिजवलेले मनुके खाल्ल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि शरीरातील अशक्तपणा दूर होतो. दुधात भिजवलेले मनुके खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
मनुक्यांना दुधात उकळून खाण्याचे फायदे
मनुके दुधात उकळून खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. त्यासाठी ८ ते १० मनुके घेऊन एक ग्लास दूध घ्या, आता हे मनुके दुधात घाला आणि हे दूध उकळू द्या. हे दूध उकळून घट्ट झाल्यावर थंड करून खावे. रात्री याचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे झोपण्यापूर्वी याचे सेवन करावे.
रिकाम्या पोटी
रिकाम्या पोटी मनुके खाल्यास अनेक आजारांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर रिकाम्या पोटी मनुके खाल्ल्याने पचनसंस्थाही मजबूत होते.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. Maha Today ने याला दुजोरा दिलेला नाही.)