अंडी हा अत्यंत लोकप्रिय होत चाललेला खाद्यप्रकार आहे. अनेकांना सकाळच्या नाष्ट्याला अंडी लागतात. अंड्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषणतत्त्व आढळतात. पण बारायचंद प्रश्न पडतो की गर्भधारणेदरम्यान अंडी खाऊ शकतात का? त्याबद्दल जाणून घेऊयात
गर्भधारणेदरम्यान अंडी खाणे सुरक्षित आहे का?
जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते, तेव्हा डॉक्टर विविध गोष्टींचे सल्ले देत असतात. यावेळी डॉक्टर प्रेग्नन्सीमध्ये काय खाऊ नये याविषयी देखिल सांगतात. कच्च्या आणि अर्धवट शिजवलेल्या गोष्टींमध्ये बॅक्टेरिया असण्याची शक्यता खूप जास्त असल्याने असले पदार्थ प्रेग्नन्सी दरम्यान खाऊ नये असा सल्ला दिला जातो. याचे कारण असे की, गरोदरपणात महिलांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते. दरम्यान गर्भधारणेदरम्यान अंडी खाणे स्त्रियांसाठी पूर्णपणे सुरक्षित मानले जाते, परंतु लक्षात ठेवा की अंडी पूर्णपणे शिजवलेली असावी. अर्धे शिजवलेले अंडे खाणे टाळावे.
गर्भधारणेदरम्यान अंडी कशी खावी
एका रिपोर्टनुसार अंड्यांमधून साल्मोनेला नावाचा आजार होण्याचा धोका खूप जास्त असतो. यामुळे सदर महिला आणि बाळासाठी खूप धोकादायक ठरू शकतो. डॉक्टर मेयोनीज चे सेवन करण्यासही नकार देतात कारण त्यात अंडी वापरली जातात. अंड्यांमध्ये अनेक गुण आढळतात. बरेच लोक अंडी पूर्णपणे शिजवलेले खातात, तर काही लोकांना अर्धवट शिजवलेले अंडे खायला आवडतात, तर अनेक देशांमध्ये कच्च्या अंड्यांचा पिवळा भाग शिजवलेल्या अन्नात मिसळून देखील खातात. पण जर तुम्ही गरोदर असाल तर तुम्ही कच्चे अंडे खाणे टाळावे. तसेच, गर्भवती महिलांनी अशा पदार्थांचे सेवन करू नये ज्यामध्ये कच्चे किंवा अर्धे शिजलेले अंडे वापरण्यात आले आहे. प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्हाला अंडी खायची असेल तर ते व्यवस्थित उकडूनच घेतले जावेत. ते उकडण्यासाठी/शिजण्यासाठी सुमारे 10 ते 12 मिनिटे लागतात. सुपरमार्केटमधून अंडी विकत घेताना ज्यामध्ये “pasteurized” लिहिलेले असेल अशीच अंडी खरेदी करावीत.
प्रेग्नेंसी मध्ये अंडी खाण्याचे फायदे
एका रिपोर्टनुसार प्रेग्नेंसी मध्ये अंडी खाणे फायदेशीर ठरते. अंड्यांमध्ये चरबी, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट फार कमी प्रमाणात आढळतात. उच्च प्रथिने आणि निरोगी चरबीयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने, शरीरात रक्तातील साखरेची पातळी राखली जाते, ज्यामुळे गर्भावस्थेतील मधुमेहाचा धोका कमी होतो. ज्या कोंबड्याना ऑर्गेनिक पद्धतीने वाढवले जाते त्या अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात आढळते.