इलेक्ट्रिक वाहन Electric Vehicle स्टार्टअप कंपनी iGowise Mobility आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर उद्या म्हणजेच 26 जानेवारी रोजी लॉन्च करणार आहे. BeiGo X4 असे या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव आहे. दरम्यान लॉन्च होण्याआधी या बाईक संदर्भात अनेक माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये रेंज, फीचर्स, किंमत यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. याचे फिचर्स अन इतर गोष्टी पाहून तुम्हीही अवाक व्हाल.
याचा अर्थ असा की Activa 125 सोबत, Grazia 125 आणि Dio ला एक नवीन स्मार्ट ऑप्शन मिळू शकतो. यामध्ये स्मार्ट चावी आणि एच-स्मार्ट फीचर्स सह सुसज्ज असेल. याशिवाय, त्यांना BS6 स्टेज 2 अनुरूप इंजिन देखील मिळतील. एच-स्मार्ट किंवा होंडा स्मार्ट तंत्रज्ञानामध्ये चार फीचर्स आहेत. यामध्ये स्मार्ट फाइंड, स्मार्ट अनलॉक, स्मार्ट स्टार्ट आणि स्मार्ट सेफ यांचा समावेश आहे.
1. स्मार्ट फाइंड: हे फीचर्स तुम्हाला तुमच्या पार्किंगमध्ये स्कूटर शोधण्यास मदत करेल. स्मार्ट कीद्वारे तुम्ही तुमची स्कूटर सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला बॅक बटणावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर स्कूटरचे चारही इंडिकेटर दोनदा ब्लिंक होतील. त्याचे सेन्सर 10 मीटर अंतरापर्यंत काम करतात.
2. स्मार्ट अनलॉक: स्कूटर लॉक किंवा अनलॉक करण्याची सोय आता चावीमध्येच असेल. तुम्ही स्मार्ट की द्वारे स्कूटरची सीट, इंधन कॅप, हँडल इत्यादी सहजपणे लॉक/अनलॉक करू शकता. तथापि, त्याची स्मार्ट-की स्कूटरच्या दोन मीटरच्या आत असणे आवश्यक आहे.
3. स्मार्ट की: नवीन Honda Activa मध्ये स्टार्ट होण्यासाठी जबरदस्त फीचर्स आहेत. जेव्हा तुम्ही स्कूटरजवळ जाल आणि चावी तुमच्या खिशात असेल तेव्हा ती ऍटोमेटिक ऍक्टिव्ह होईल. म्हणजे चावी काढायची गरज भासणार नाही. तुम्हाला फक्त नॉब पुश करायचा आहे, त्यानंतर स्पीडोमीटरवरील एलईडी स्मार्ट की इंडिकेटर ऑन होतात, त्यानंतर तुम्हाला नॉब चालू करावा लागेल आणि गाडी सुरु होईल.
4. स्मार्ट सेफ: अॅक्टिव्हा मॅप केलेल्या स्मार्ट ECU ने सुसज्ज आहे जे ECU आणि स्मार्ट की यांच्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जुळवून (आयडी) सुरक्षित उपकरण म्हणून काम करते त्यामुळे वाहन चोरी होण्यापासून बचाव होतो. स्मार्ट कीमध्ये एक इमोबिलायझर सिस्टीम आहे जी डुप्लिकेट चावीद्वारे इंजिन सुरू करण्यापासून प्रतिबंधित करते. स्मार्ट की सह सुरक्षित कनेक्शनशिवाय, इमोबिलायझर सिस्टम ऍक्टिव्ह होत नाही. त्यामुळे गाडी चोरीला जाण्याची शक्यता कमी होते.