Flipkart Delivery : पुण्यासह देशातील 20 शहरांमध्ये आता मिळणार ‘सेम डे डिलिव्हरी`

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

या सुविधेमुळे आता फ्लिपकार्टचे यूजर्स वाढण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. लवकरच ही सुविधा देशातील इतर शहरांमध्ये देखील उपलब्ध करणार असल्याचं फ्लिपकार्टने स्पष्ट केलं.

Flipkart Same Day Delivery : ऑनलाईन शॉपिंग करताना सगळ्यात कठिण गोष्ट म्हणजे ऑर्डर डिलिव्हर होण्याची वाट पाहणं. अमेझॉन प्राईम यूजर्सना बऱ्याच शहरांमध्ये वन-डे किंवा सेम-डे डिलिव्हरी मिळते. अशीच सुविधा आता फ्लिपकार्टनेही सुरू केली आहे. देशातील 20 शहरांमध्ये फ्लिपकार्ट आता सेम-डे डिलिव्हरी देणार आहे.

या सुविधेमुळे आता फ्लिपकार्टचे यूजर्स वाढण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. लवकरच ही सुविधा देशातील इतर शहरांमध्ये देखील उपलब्ध करणार असल्याचं फ्लिपकार्टने स्पष्ट केलं. यापूर्वी देखील फ्लिपकार्टने दहा शहरांमध्ये या सुविधेची चाचणी घेतली होती, मात्र ती लगेच बंद करण्यात आली होती. आता फ्लिपकार्टने पुन्हा एकदा याबाबत घोषणा केली आहे.

काय आहे अट?
सेम डे डिलिव्हरी मिळण्यासाठी यूजर्सना दुपारी एक वाजेपर्यंत ती वस्तू ऑर्डर करावी लागणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत ती वस्तू तुमच्या घरी पोहोचवली जाईल. दुपारी एकनंतर ऑर्डर केलेल्या वस्तू मात्र दुसऱ्या दिवशी किंवा त्यापेक्षा उशीरा येतील.

कोणत्या शहरांचा समावेश?
मुंबई
पुणे
नागपूर
अहमदाबाद
बंगळुरू
भुवनेश्वर
कोयंबतूर
चेन्नई
दिल्ली
गुवाहाटी
इंदूर
जयपूर
कोलकाता
लखनऊ
हैदराबाद
पाटणा
रायपूर
सिलीगुडी
विजयवाडा

फ्लिपकार्टने यापूर्वी 2014 साली अशीच सुविधा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही महिन्यांमध्येच ही सुविधा बंद केली. दुसरीकडे अमेझॉन 2017 पासूनच कित्येक शहरांमध्ये सेम-डे डिलिव्हरी देत आहे. आता फ्लिपकार्टचा हा दुसरा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.