आपल्या आहारात फळे समाविष्ट असावीत असे म्हटले जाते. फळाच्या सेवनाने अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते. प्रत्येक फळांचे वेगवेगळे वैशिष्ट्य असते. यापैकीच एक फळ म्हणजे चिकू. चिकू मध्ये अनेक गुणधर्म असतात. यामध्ये तब्बल चौदा गुण आहेत. ते तुम्हाला मोठ्या आजारांपासूनही ते दूर ठेवतात. चला जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर..
केसांचे आरोग्य
चिकू खाल्ल्याने केसांचे आरोग्य सुधारते. तुमच्या केसांची वाढ चांगली होते. चिकूच्या बियांपासून येणारे तेलही खूप गुणकरी आहे.
त्वचा
चिकूचे सेवन केल्याने त्वचा मुलायम होते. अनेक त्वचा विकार नष्ट होतात. चिकूमध्ये व्हिटॅमिन ई, ए आणि सी असते. ज्याचा फायदा तुमच्या त्वेचेला होऊ शकतो.
सर्दी / खोकला
जर तुम्हाला खोकला किंवा सर्दी असेल तर चिकू खाल्ल्यानं क्रोनिक कफ मधून आराम मिळतो.
किडनी
सध्या किडनीच्या समस्या वाढताना दिसत आहेत. चिकूमध्ये ड्यूरेटिक असते ज्यामुळे तुम्हाला मुत्रपिंडाचे त्रास होत नाहीत.
मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम
चिकूमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तुमचा मेंदू तंदुरूस्त राहतो. यामुळे भिती, डिप्रेशन आणि बैचेनी तसेच चिडेचिडेपणाही कमी होण्यास मदत होते.