Gauhar Jaan : संगीत क्षेत्रामध्ये अनेक दिग्गज आहेत. पण याठिकाणी आपण आज अशा गायिकेविषयी जाणून घेऊयात की जिने 1902 मध्ये भारतातील पहिले गाणे रेकॉर्ड करून इतिहास रचला होता. ज्यावेळी सोने 20 रुपये तोळ्याने भेटत होते तेव्हा ही गायिका एका गाण्यासाठी 3 हजार रुपये घेत होती.
व तुम्हाला हे देखील ऐकून आश्चर्य वाटेल की, या गायिकेला कार्यक्रमासाठी जाण्यासाठी प्रायव्हेट ट्रेन दिली जायची. या गायिकेचा नाव आहे गौहर जान. परंतु या गायिकेचा शेवट मात्र अत्यंत गरिबीत झाला. संगीत क्षेत्राचा नक्षा बदलावणारी गौहर जान हिचा जन्म कोठ्यावर झाला होता. गौहर जानचा जन्म 26 जून 1873 रोजी आझमगडमध्ये झाला. तिचे वडील रॉबर्ट मूळचे आर्मेनियन आणि भारतीय आई व्हिक्टोरिया यांनी तिचे नाव आयलीन अँजेलिना ठेवले. वयाच्या 6 व्या वर्षी आई-वडील वेगळे झाले तेव्हा आईने एका मुस्लिमाशी लग्न केले आणि मलका जान बनली. व एली अँजेलिना बनली गौहर जान.
गाणे रेकॉर्ड करणारी गौहर पहिली गायिका
गौहर जानने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी शास्त्रीय संगीत शिकले. ख्याल आणि ठुमरीत त्या निपुण होत्या. त्यांची गाणी ऐकायला येणारे लोक त्यांना सोन्या-चांदीच्या भेटवस्तू द्यायचे. त्यांची गाणी ऐकणे सर्वसामान्यांसाठी स्वप्नवत होते. भारतात व्यवसाय करू इच्छिणाऱ्या UK च्या ग्रामोफोन कंपनीने हे चांगलेच समजून घेतले. ग्रामोफोन कंपनीने तिला गौहरची गाणी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी रेकॉर्डिंग करण्यास सांगितले. 3000 रुपयांची फी घेऊन गौहर जान ही भारतातील पहिली गायिका ठरली जिचे गाणे रेकॉर्ड केले गेले. 1902-20 पर्यंत, गौहरने 20 भाषांमध्ये सुमारे 600 गाणी रेकॉर्ड केली, ज्यामुळे ती भारताची रेकॉर्डिंग स्टार बनली.
प्रसिद्धीच्या झोतात राहिले तिचे शाही जीवन
त्यांच्या गाण्यांपेक्षा त्यांचे राजेशाही आयुष्य अधिक चर्चेत राहिले. परफॉर्मन्ससाठी जाण्यासाठी गौहरने वैयक्तिक ट्रेनची मागणी केली होती, तीही पूर्ण झाली. तिचे वैयक्तिक जीवनही अशांततेने भरलेले होते. ती ज्या घरमालकाच्या प्रेमात पडली होती त्याच्याशी काही दिवसांतच संबंध तुटले. 10 वर्षांनी लहान पर्सनल असिस्टेंट सय्यद गुलाम अब्बासशी लग्न केले पण इथेही फसवणूक झाली. बराच काळ कायदेशीर लढा चालला. ज्या व्यक्तीमध्ये गौहर जानला तिसर्यांदा सहानुभूती मिळाली, त्याच्या आकस्मिक मृत्यूने तिला आतून तोडून टाकले. ज्या नातेवाईकांनी तिला नेले त्यांनी तिची संपूर्ण संपत्ती लुटली. एका युगातील करोडपती व्यक्तिमत्व गौहर जान शेवटच्या काळात कंगाल झाली. 17 जानेवारी 1930 रोजी भारताची रेकॉर्डिंग सुपरस्टार गौहर जान यांनी वयाच्या 60 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.