मागील काही दिवसांमध्ये आर्थिक जगतात चांगल्याच घडामोडी सुरु आहेत. अमेरिकी रिसर्च फर्म हिंडनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी यांचे शेअर्स घसरण्यापासून तर त्यांचे श्रीमंतांच्या यादीतून दुसऱ्या स्थानावरून थेट अगदी 15 व्या स्थानावर जाण्यापर्यंतच्या घडामोडींनी गुंतवणूकदारांना हादरून सोडले आहे.
अमेरिकी रिसर्च फर्म हिंडनबर्गच्या अहवालानंतर भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना जो फटका बसला आहे, त्यातून दिलासा मिळताना दिसत नाही. आजही त्यांच्या एकूण संपत्तीत मोठी घसरण झाली आणि अब्जाधीशांच्या यादीत ते थेट 15 व्या क्रमांकावर घसरले. गौतम अदानी यांच्या साम्रज्यात एका आठवड्यात अशी त्सुनामी आली के सगळेच हादरून सोडले आहे. हिंडेनबर्गने 24 जानेवारी रोजी अदानी समूहाबाबत आपला अहवाल प्रकाशित केला होता, ज्यामध्ये समूहावरील कर्जाबाबतही दावे करण्यात आले होते.
या अहवालानंतर अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळू लागले. ते आजतागायत सुरूच आहे.
फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांच्या संपत्तीत गेल्या 24 तासांत 13.1 अब्ज डॉलरची घट झाली आहे आणि आता त्यांची एकूण संपत्ती फक्त 75.1 अरब डॉलर इतकी राहिली आहे.
अदानी समूहाच्या शेअर बाजारात लिस्टेड झालेल्या सात कंपन्यांमधील शेअर्सच्या घसरणीमुळे अवघ्या चार दिवसांत अदानी समूहाच्या कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप सुमारे सात लाख कोटी रुपयांनी घटले आहे. अदानी टोटल गॅस आणि अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये गेल्या पाच दिवसांत 20 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. याशिवाय अदानी पोर्ट्सपासून ते अदानी विल्मारपर्यंत शेअर बाजारात सूचिबद्ध झालेल्या त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स खराब झाले आहेत आणि ही घसरणीची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे.
आजही अदानी शेअर्सची दयनीय अवस्था
गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अर्थसंकल्प जाहीर होतानाही घसरण सुरूच होती. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे शेअर्स कंपनीचा शेअर 26.70% किंवा 794.15 रुपयांनी घसरून 2,179.75 रुपयांवर बंद झाला. यानंतर अदानी पोर्ट्सचे शेअर 17.73 टक्क्यांनी अर्थात 108.65 रुपयांनी घसरून 504 रुपयांवर बंद झाले. अदानी टोटल गॅसचा स्टॉक 10 टक्क्यांनी किंवा 210 रुपयांनी घसरला आणि 1,897.40 च्या पातळीवर बंद झाला.