मुंबई : गौतमीचा ‘घुंगरू’ हा आगामी चित्रपट असून या चित्रपटामधील पाहिली लावणी आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गौतमी पाटील सध्या चर्चेत आहेत.
सर्वांवर डान्सची मोहिनी घातल्यानंतर गौतमी रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. गौतमीचा ‘घुंगरू’ हा आगामी चित्रपट असून या चित्रपटाचा पहिले लावणी आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या लावणीचे नाव ‘मी करते तुम्हाला मुजरा’ असे आहे. गौतमीचा ‘मी करते तुम्हाला मुजरा ही लावणी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
”मी करते तुम्हाला मुजरा’ ‘मधील ढोलकी ताल, घुंगराची गाणी आणि गौतमीची दिलखेचक अदा चाहत्यांना आकर्षित करते. पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी, त्याला लाल रंगाची जरीची काठ, साज, केसात गजरा, नथा असा काहीसा गौतमीचा लुक आहे. ‘मी करते तुम्हाला मुजरा’ ही लावणी साईनाथ पाटोळे आणि मारुती सोनू यांनी लिहिली आहे.
गौतमी पाटीलचा ‘घुंगरु’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गौतमीच्या आगामी ‘घुंगरु’ या सिनेमाचं शूटिंग सोलापूर, मढ, हंपीसह परदेशातदेखील झालं आहे.