महाराष्ट्राला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी भेट दिली आहे. महाराषट्राला आता आणखी दोन नव्याने वंदेभारत रेल्वे मिळाल्या आहेत.मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन वंदेभारतचे उद्घाटन पंतप्रधान मोदी दहा तारखेला करणार आहेत.
या दोन रेल्वेमुळे महाराष्ट्राला मिळालेल्या वंदेभारतची गाड्यांची संख्या चार झाली आहे. या रेल्वे ताशी 180 किमीच्या वेगाने धावतात अशी माहिती एका रिपोर्टनुसार समोर आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याचा कार्यक्रम रेल्वे बोर्डाकडून आला असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ठ केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSTM) येथून सीएसएमटी-सोलापूर आणि सीएसएमटी-साई नगर शिर्डी या दोनवंदेभारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
या दोन वंदे भारत एक्सप्रेसमुळे चांगलंच फायदा होणार आहे. महाराष्ट्रातील शिर्डी आणि पंढरपूर या लोकप्रिय तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या भाविकांची यामुळे सोया होनारस्याचे सांगण्यात आले आहे. देशभरात एकूण आठ वंदे भारत सध्या धावत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी-मरोळ येथील बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
अल जामिया येथील तस सैफिया विद्यापीठाचे उद्घाटन होणार आहे. मोदी यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी बोहरा कॉलनी परिसरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.