Gold Loan : बऱ्याचदा आपल्याला अचानक पैशांची गरज पडते. अशावेळी तात्काळ पैसे उभे करण्यासाठी बहुतांश लोक गोल्ड लोनचा वापर करतात. याद्वारे तात्काळ पैशांची उपलब्धता होते. यामध्ये दागिने बँकेत गहाण ठेऊन पैसे उपलब्ध केले जातात.
अनेक जण कमी व्याजदरात गोल्डलोन कुठे मिळेल याच्या शोधात असतात. येथे आपण कमी व्याजात गोल्ड देणाऱ्या बँकांविषयी जाणून घेऊयात-
दागिने बँकेत तारण म्हणून ठेवावे लागतात –
बाजारातील सोन्याच्या किमतीच्या आधारे बँक तुम्हाला किती कर्ज देईल हे निश्चित होते. गोल्ड लोन घेण्यासाठी बँकेकडे सोने गहाण ठेवावे लागते. बँकेकडून कर्ज घेतलेल्या व्यक्तीने कर्जाची रक्कम आणि निश्चित व्याजाची वेळेवर परतफेड केली, तर त्याला त्याचे सोने परत मिळेल. गोल्ड लोन हे सुरक्षित कर्ज आहे, म्हणून ते इतर कर्जांपेक्षा कमी व्याजदराने बहुतेक वित्तीय संस्थांद्वारे प्रदान केले जाते.
या बँका स्वस्त दरात सोने कर्ज देत आहेत
15 पेक्षा जास्त बँका आणि 3 नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांनी ऑफर केलेल्या सुवर्ण कर्ज योजना, व्याज दर आणि मासिक हप्ता (EMI) बद्दल तपशील येथे दिले आहेत. या वित्तीय संस्थांकडून 5 लाखांपर्यंतचे गोल्ड दिले जाते. कर्जाचा कालावधी 5 वर्षे आहे.
या यादीत समाविष्ट असलेली युनियन बँक आपल्या ग्राहकांना 8.40 टक्के वार्षिक व्याजदराने 2 वर्षांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देत आहे. या कर्ज योजनेत, कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला 22,705 रुपयांच्या मासिक हप्त्याच्या स्वरूपात EMI जमा करावी लागेल.
त्याचप्रमाणे सेंट्रल बँक 8.45 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे, तर SBI 8.55 टक्के व्याजदराने वार्षिक आधारावर कर्ज देत आहे. गोल्ड लोन घेण्यापूर्वी तुम्ही ही यादी तपासू शकता.