लग्नसराईच्या काळ सुरू झाला असताना सोन्याच्या भावाने खरेदीदारांना काहीसा दिलासा दिला. आज सोन्याच्या दरात छोटीशी घसरण झाली आहे. मात्र आज चांदीच्या दरात वाढ झाली असून किलोमागे 67000 रुपये चा टप्पा पार केल्याचे दिसून येते.
सोन्याची खरेदी करण्यासाठी लग्नाचा सिजन महत्त्वाचा असतो. आज सोन्याच्या दरात आलेल्या नरमाईमुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाल्याचं दिसत आहे. सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव ३० रुपयांनी घसरून ५४,३०५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मागच्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव ५४.३३५ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. मात्र, चांदीचा भाव 558 रुपयांनी वाढून ६७,३६५ रुपये प्रति किलो झाला आहे..
डॉलरची कमजोरी आणि देशांतर्गत शेअर बाजारातील मजबूतीमुळे शुक्रवारी विदेशी चलन बाजारात सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपया १९ पैशांनी वाढून ८२.१९ वर पोहोचला.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे Hdfc Securities संशोधन विश्लेषक दिलीप परमार म्हणाले, “रुपया मजबूत झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती किरकोळ घसरल्या.” आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव $१,७९१.९ प्रति औंसने वाढला. चांदी 23.07 डॉलर प्रति औंस वर व्यापार करत होती.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष (कमोडिटी मार्केट रिसर्च) नवनीत दमानी म्हणाले, “डॉलर निर्देशांकातील घसरणीमुळे सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली. पुढील आठवड्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीत व्याजदरवाढीचा निर्णय आणि महागाईच्या महत्त्वाच्या आकडेवारीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.