गुरुवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून या लग्नसराईच्या हंगामात बाजारात सोन्याचे दर स्थिरावले आहेत. चांदीच्या दरातही प्रतिकिलो 500 रुपयांची घसरण झाली आहे. जर तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही सर्वोत्तम वेळ आहे.
एक्साईज ड्युटी आणि मेकिंग चार्जेसमुळे सोन्या-चांदीच्या दरात दररोज वाढ होताना दिसत आहे. आज बाजारात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 53,500 रुपये आहे. 14 फेब्रुवारीला हा दर 53600 रुपये होता. तर 13 फेब्रुवारीला हाच दर 53700 रुपये होता. 10 फेब्रुवारीला हा दर 54000 रुपये होता.
24 कॅरेट सोन्याची किंमत
मुंबई सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव १६ फेब्रुवारीला 56,730 रुपये, कोलकाता सराफा बाजारात 56,950 रुपये, दिल्ली सराफा बाजारात 10 कॅरेट सोन्याचा भाव 56,880 रुपये आहे. व्हॅलेंटाइन डे आणि लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीचे दर स्थिर झाले आहेत, अशी माहिती एका सराफ व्यासायिकाने दिली आहे. सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चांदीचा भाव
चांदीच्या किंमती दिल्ली सराफा बाजारात 1 किलो चांदीची किंमत 69000 रुपये आहे, मुंबई सराफा बाजारात आणि कोलकाता सराफा बाजारात देखील चांदीची किंमत तितकीच आहे, तर चेन्नई सराफा बाजारात किंमत 71800 रुपये आहे.